Parbhani News : पत्रकाराला धमकावल्याप्रकरणी नायब तहसीलदारांवर अदखलपात्र गुन्हा

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन –  पाथरी येथील एका पत्रकाराला धमकी दिल्याप्रकरणी पाथरी तहसीलचे नायब तहसीलदार सुभाष कट्टे यांच्याविरूद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाथरीच्या तहसीलमध्ये तहसीलदार पदाचे कांड या शीर्षकाखाली पत्रकार विठ्ठल साळवे यांनी परभणी प्रजा गर्जनामध्ये मंगळवारी (दि. 26) बातमी छापली. बातमी छापल्या वरून पत्रकार विठ्ठल साळवे यांना नायब तहसीलदार सुभाष कट्टे यांनी जिवे मारण्याची धमकी दिली.

नायब तहसीलदार यांच्या गैर कारभाराबद्दल छापलेल्या बातमीचे वृत्तपत्र वितरण करीत असताना विठ्ठल साळवे यांच्याशी 26 जानेवारी रोजी दुपारी 3.30 वाजता तहसीलदार सुभाष कट्टे यांनी भ्रमणध्वनी वरून संपर्क केला व त्यांना जिवंत जिवे मारण्याची धमकी दिली. अशी फिर्याद बुधवारी (दि.27) पत्रकार विठ्ठल साळवी यांनी पोलिसांत दिली. यावरून पोलिसांनी नायब तहसीलदार सुभाष कट्टे यांच्याविरुद्ध पाथरी पोलिसात अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे.

वृत्तपत्रातून अधिकार्‍यांच्या मनमानी गैर कारभाराबद्दल वाचा फोडणाऱ्या पत्रकारास धमकी दिल्याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नायब तहसीलदारांविरूद्ध काय कारवाई होणार ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, पाथरीचे तहसीलदार यांची पूर्व मान्यता न घेताच नायब तहसीलदार सुभाष कट्टे यांनी एक दीड महिन्यापूर्वीची तारीख टाकून आदेश निर्गमित केले. याप्रकरणी तहसीलदार श्रीकांत निळे यांनी नोटीस बजावून खुलासा मागितला आहे.