Non-Creamy Layer Certificate | खुल्या, मागास प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्राची आवश्यकता नाही

पोलीसनामा ऑनलाइन – Non-Creamy Layer Certificate | खुल्या गटातील महिलांकरीता आरक्षित पदावरील निवडीकरीता तसेच सर्व मागास प्रवर्गातील महिलांना नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्राची अट शिथील करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत (Maharashtra Cabinet Decisions) घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. (Non-Creamy Layer Certificate)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) प्राध्यापक पदावरील भरती प्रक्रियेदरम्यान अराखीव (महिला) या पदावर गुणवत्ता क्र.३ वरील महिला उमेदवाराची नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र नसल्यामुळे निवड न करता गुणवत्ता क्र. ६ वरील उमेदवाराची निवड करण्यात आली. या पदाकरीता सहयोगी प्राध्यापक पदावरील तीन वर्षाचा अनुभव अशी अर्हता निश्चित करण्यात आलेली होती. या पदाचे वेतन विचारात घेता सध्याच्या नॉन-क्रिमिलेअर मर्यादेपेक्षा अधिक होत असले तरी नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्राप्त उमेदवारांना या खुल्या गटातील महिला आरक्षित पदावर निवड होऊन त्याचा लाभ होत होता.

हा लाभ सर्व प्रवर्गातील महिला उमेदवारांना होणे आवश्यक असल्याने त्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक होते.
त्यानुसार आता खुल्या गटातील महिलांकरीता आरक्षित पदावरील निवडीकरीता खुल्या प्रवर्गातील महिला तसेच
सर्व मागास प्रवर्गातील महिलांना नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्राची आवश्यकता असणार नाही.

Web Title :- Non-Creamy Layer Certificate | Open, Backward Class Women do not require non-creamy layer certificate

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC Property Tax | पुणे महापालिकेच्या हद्दीतील मालमत्ता करात ४० टक्के सवलत पुन्हा लागू – पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

Maharashtra Political News | ‘अजित पवारांबाबत बातम्या पसरवण्यास राऊतांनी सुरुवात केली’, भाजप नेत्याचा संजय राऊतांवर निशाणा

Nashik MNS | नाशिक मनसेमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर! शहराध्यक्ष दिलीप दातीर यांचा तडकाफडकी राजीनामा

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोरेगाव पार्क पोलिस स्टेशन – वेगवेगळे बहाणे करून चारचाकींमधील बॅगा लंबाविणार्‍या परप्रांतीय टोळीला अटक, 8 गुन्हयांची उकल

Covid 19 Hospitals In Maharashtra | वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन : खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात 25 समर्पित कोविड रुग्णालये कार्यान्वित