Video : एकदम ‘टाईट’ ड्रेस घालून साकी-साकी गाण्यावर अशी थिरकली Nora Fatehi, पाहणारे पाहतच राहिले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नोरा फतेहीचा डान्स म्हणजे खासच असतो, तो चाहत्यांची झोप उठवतो. त्यातच तिचे मादक सौंदर्य आणखी घायाळ करते. आता नोराने पुन्हा एकदा आपल्या डान्समध्ये कंबरेला असे झटके दिले आहेत की पाहणार्‍यांची शुद्धच हरपली. आम्ही तर तुम्हाला सल्ला देऊ की तुम्ही हा व्हिडिओ पहाल तेव्हा हृदयावर लक्ष ठेवा कारण हृदयाची धडधड वाढू शकते आणि स्वत:ला सांभाळणे तुमच्यासाठी अवघड होऊ शकते.

नोरा ने स्टेजवर केला साकी-साकी गाण्यावर डान्स
नोरा फतेहीने जी गाणी दिली आहेत ती संस्मरणीय ठरली आहेत, मग ते दिलबर असो की, साकी साकी. याचे कारण हे आहे की, या गाण्यांमध्ये नोरा फतेहीचा लाजवाब डान्स आहे. जो पाहून लोकांचा श्वास थांबल्यासारखा झाला होता. आता पुन्हा एकदा नोराने साकी-साकी गाण्यावर शानदार सादरीकरण केले आहे. नुकतेच डान्स दिवाणेच्या फॅन स्पेशल एपिसोडमध्ये नोरा फतेही पोहचली होती कारण नोरा माधुरी दीक्षितची जबरदस्त फॅन आहे.

यावेळी नोराने सादर केलेल्या नृत्याने सर्वचजण घायाळ झाले. नोरा ने शोचे जज आणि कोरियोग्राफर आणि डान्सर तुषार कालियासोबत आपला हिट डान्स नंबर साकी-साकी वर परफॉर्मन्स दिला आणि सेटवर उपस्थितीत प्रत्येक व्यक्ती केवळ एकटक पहातच राहीला.

डान्स दिवाने च्या सेटवर धमाल मजामस्ती
डान्स दिवाने च्या ज्या एपिसोडमध्ये नोरा फतेही गेली होती त्यामध्ये धमाल मस्ती झाली. तर माधुरीला पाहून नोराने आपल्या मनातील गोष्ट सांगितली. तिने माधुरी दीक्षितला देवदासच्या गाण्यावर सोबत डान्स करण्याची विनंती केली, जी माधुरीने प्रेमाने स्वीकारली आणि नंतर स्टेजवर या दोन डान्सिंग क्विनने धमाल केली.