Norovirus | कोरोना व्हायरससोबत आता वाढला ’नोरो व्हायरस’ चा धोका, जाणून घ्या याची लक्षणे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  इंग्लंडमध्ये कोरोना व्हायरससारखाच नोरो व्हायरस (Norovirus) नावाचा आजार वेगाने पसरत आहे. ज्याची लक्षणे कोरोना व्हायरसशी (Corona) मिळती-जुळती आहेत आणि सध्या Norovirus वर कोणताही उपचार उपलब्ध नाही. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) नुसार, हा कम्युनिकेबल डिसीज म्हणजे एकातून दुसर्‍यात पसरणारा आजार आहे.

नोरो व्हायरस ‘वोमेटिंग बग’च्या नावाने सुद्धा ओळखला जातो. पब्लिक हेल्थ इंग्लंड (PHE) नुसार, मागील पाच आठवड्यात या व्हायरसची 154 नवीन प्रकरणे समोर आली आहेत.

कोरोनाप्रमाणे पसरतो हा व्हायरस

सीडीसीचे म्हणणे आहे की, नोरो व्हायरसमध्ये अनेक अरब व्हायरस आहेत. कुणीही व्यक्ती जर या व्हायरसने संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आली, संक्रमित जेवण खाल्ले, व्हायरसने प्रभावित जागला स्पर्श केला किंवा हात न धुता तोंडात टाकला, तर तो या व्हायरसने संक्रमित होण्याचा जास्त धोका आहे. हा व्हायरस दुसर्‍या व्हायरसप्रमाणे शरीरात दाखल होऊन संक्रमित करतो.

नोरो व्हायरसची लक्षणे (Noro virus symptoms)

– डायरिया, उलटी, डोकं गरगरणे आणि पोटात जास्त वेदना होणे याची महत्वाची लक्षणे आहेत.

– याशिवाय ताप, डोकेदुखी आणि अंगदुखीची समस्या सुद्धा होऊ शकते.

– व्हायरसने संक्रमित व्यक्तीला 2 ते 3 आठवड्यापर्यंत उलटी होते.

असा करा बचाव

– शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास हा व्हायरस जास्त अ‍ॅक्टिव्ह राहाते. यासाठी भरपूर पाणी किंवा ज्यूस घेत रहा.

– इलेक्ट्रोलाइट्स आणि ओआरएसचे मिश्रण पित रहा.

– स्वच्छतेकडे लक्ष ठेवा.

– जर संक्रमित झाला असाल तर घरातून बाहेर पडू नका.

– बाहेरून आणलेली वस्तू जसे की, फळे, भाजी, दूध पिशवी धुवून घ्या.

– हात धुवत रहा.

Web Title : norovirus | with-the corona virus now the increased risk of norovirus know its symptoms

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Mumbai News | मुंबईत भूस्खलनाचा धोका असलेली 291 ठिकाणं, ‘मृत्यू’चे सर्वाधिक हॉटस्पॉट ‘या’ वॉर्डात

Google data | तुम्हाला पॉर्न बघण्याची भारतीयांची आवडीची वेळ माहित्येय का? गुगलनं केला खुलासा

Nana Patole | काँग्रेस महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार, राहुल गांधीसोबत झालेल्या बैठकीत निर्णय; नाना पटोलेंची माहिती