SBI | ‘या’ तारखेपर्यंत करा ‘आधार’ पॅन कार्डशी लिंक, अन्यथा बंद होतील महत्वाच्या सेवा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) खातेदारासाठी एक महत्वाची बातमी दिली आहे. बँकेने 30 जून पर्यंत आधार कार्ड Aadhar Card पॅन कार्डशी जोडण्याबाबत सूचना जारी केली आहे. आयकर विभागाकडून Income Tax Department याबाबत म्हणजेच आधार कार्ड पॅन कार्डशी PAN Card लिंक करण्यासाठी अंतिम तारीख 30 जून ही डिक्लेअर करण्यात आली आहे. जर ग्राहकांनी आधार Aadhar Card पॅन कार्डशी लिंक केलं नाहीतर 30 जून नंतर पॅन कार्ड निष्क्रिय होणार आहे. मुखतः म्हणजे ग्राहकाला Customer आयकराच्या कायदयानुसार एक हजार रुपयाचा दंड सुद्धा होणार आहे. याबाबत माहिती बँकेनं Bank ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

मागील काही दिवसापूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) असंच एक ट्विटद्वारे माहिती दिली होती. बँकिंग सेवांसाठी आधार कार्ड -पॅन कार्ड लिंक असणं अनिवार्य असल्याचं सांगितलं होतं. आम्ही ग्राहकांना सल्ला देतो की पॅन कार्ड तुमच्या आधार कार्डशी लिंक करा, जेणेकरुन गैरसोय टाळता येऊ शकेल आणि तुम्ही अडथळा न येता बँकिंग सेवांचा Banking Services आनंद घेऊ शकता. अशी सूचना बँकेने Bank अधिकृत ट्विटर आयडीवरून केली होती.

Ajit Pawar | कुंभमेळ्यात जे घडलं ते आषाढी वारी सोहळ्यात घडू नये

 

लिंक करण्याची प्रोसेस –
ग्राहक आयकर विभागाच्या Income Tax Department वेबसाइटवरून अधिक माहिती घेऊ शकतो. तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक आहे की नाही. याची माहिती घेण्यासाठी ग्राहकांनी आयकर विभागाच्या वेबसाइटवर जाऊन याबाबत माहिती घेऊ शकतो. तेथे आधार कार्डावरील नाव, तुमचा पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक प्रविष्ट करा. आधार कार्डवर फक्त जन्माचं वर्ष असेल तर तसा पर्याय निवडा. कॅप्चा टाकून लिंक आधारवर क्लिक करणे.

SMS पाठवून लिंक करा पॅन कार्ड-आधार कार्ड –

UIDPAN टाइप करणे.

त्यानंतर 12 अंकी आधार क्रमांक लिहणे.

त्यानंतर 10 अंकी पॅन क्रमांक PAN Number लिहून 567678 अथवा 56161 या क्रमांकावर पाठवणे.

तुम्हाला हा मेसेज रजिस्टर्ड क्रमांकावरुनच करावा लागणार आहे.

निष्क्रिय पॅन कार्ड कसं कराल सक्रीय ?
‘समजा ग्राहकांचं पॅन कार्ड निष्क्रिय झालं. तरी देखील पॅन कार्ड सक्रीय करता येऊ शकते. त्याबाबत माहिती अशी.

मेसेज Message बॉक्समध्ये जाणे.

रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून Mobile Number 12 अंकी आधार नंबर लिहणे.

त्यानंतर 10 अंकी पॅन नंबर लिहून 567678 किंवा 56161 या क्रमांकावर पाठवणे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title :  notice by state bank of india you have to link your pan with aadhaar then only you can use all bank service 

 

हे देखील वाचा

12 जून राशीफळ : ‘या’ 6 राशींना होणार फायदा, नोकरी-व्यापार आणि आर्थिक क्षेत्रात मिळेल यश, इतरांसाठी असा आहे शनिवार

फेसबुकवर महिन्याभरापूर्वीच ओळख झालेल्या मित्राने आयटी इंजिनिअर महिलेला 44 लाख रुपयांना फसवलं; कोरोना व इतर भूलथापा मारल्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा