जोकोविचने बनला सिनसिनाटी मास्टर्स

सिनसिनाटी: 

सर्बियाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररचा पराभव करीत एटीपी सिनसिनाटी मास्टर्स स्पर्धेतील पुरूष एकेरीचे विजेतेपद पटकावले. या विजयाबरोबरच जोकोविचने सर्व नऊ मास्टर्स १००० स्पर्धा जिंकण्याचा विक्रम केला आहे. १९९० पासून सुरु झालेल्या मास्टर्स प्रकारातील सर्व स्पर्धा जिंकणारा जोकोविच हा पहिलाच खेळाडू ठरला आहे.
[amazon_link asins=’B01LWJ2J8G’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3a464fda-a477-11e8-b021-71ea5acd5f74′]

जागतिक क्रमवारीमध्ये १०व्या क्रमांकावर असणाऱ्या जोकोविचने पुरूष एकेरी स्पर्धेत जागतिक क्रमवारीमध्ये दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या फेडररचा ६-४, ६-४ अशा सरळ सेटमध्ये पराभव करत विजेतेपद पटकावले. सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धेत फेडरर तब्बल सातवेळा चैंपियन ठरला आहे. तर पहिल्यांदाच अंतिम सामन्यात हरला आहे.जोकोविच आणि फेडरर यांच्या दरम्यान आत्तापर्यंत ४६ सामने झाले असून सिनसिनाटी मास्टर्स स्पर्धेतील विजयाबरोबरच जोकोविचने त्यापैकी २४ सामने जिंकले आहेत तर फेडररने २२ सामने जिंकले आहेत. यापैकी शेवटचे तिन्ही सामने जोकोविचनेच जिंकले आहेत हे विशेष. या ४६ पैकी ३४ सामने हे हार्ड कोर्टवर झाले असून त्यापैकी १८ सामने जोकोविच जिंकला आहे. जोकोविचने सामना जिंकल्यानंतर ट्वीट करून ‘स्वप्न पूर्ण झाले, असे लिहिले आहे. या स्पर्धेमध्ये जोकोविच एकूण पाच वेळा अंतिम सामने हरला होता. त्यापैकी तीनदा फेडररनेच त्याला हरवले होते. म्हणूनच जोकोविचचा हा विजय खास आहे.