तुमच्याकडे पदवी नाही तरी ‘नो-टेन्शन’, मिळेल नोकरी; हे आहेत पर्याय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या नोकरी मिळविण्यासाठी किमान पदवीधर ही अट सर्व नोकऱ्यामध्ये आहे. पण काही क्षेत्रातल्या नोकऱ्या अशासुद्धा आहेत ज्या तुम्ही डिग्रीने नाही तर तुमच्या कलागुणांच्या आधारावर मिळवू शकता. सध्याच्या युगात कंपनीसुध्दा उमेदवारांच्या शैक्षणिक गुणांपेक्षा त्याचे त्या क्षेत्रातील ज्ञान, कौशल्य, आवड आणि अनुभव पाहूनच नोकरीची संधी देत आहेत. कोणत्या आहेत या नोकऱ्या जाणून घ्या.

1) फोटोग्राफर  (Photographer) : सध्या डिजिटल फोटोग्राफीला प्रचंड मागणी वाढली आहे. फोटोग्राफी हा फक्त काही लोकांचा छंद आहे. पण ते त्यांच्या या छंदाला व्यवसायात बदलून चांगली कमाई करू शकतात. फोटो स्टुडीओ आणि मीडिया कंपनीला चांगल्या फोटोग्राफरची गरज असते. तुमच्यात फोटोग्राफीचे कौशल्य असेल तुम्ही आकर्षक छायाचित्रे कॅप्चर करत असाल तर कोणत्याही डिग्रीशिवाय तुम्ही ती नोकरी सहज मिळवू शकता.

2 कंटेंट रायटर (Content Writer) : कंटेंट लिहून हवा अशी एखादी तरी पोस्ट तुम्हाला हमखास फेसबुकवर दिसते. तसेच ब-याच ठिकाणी कंटेंट रायटर साठी जाहिरात दिसते. यासाठी तुमचे फक्त भाषेवरचे प्रभुत्व आणि त्या विषयाबद्दलची तुम्हाला असलेली माहिती ही सुद्धा कित्येकदा तुम्हाला ती नोकरी मिळवून द्यायला पुरेशी ठरते.

3) युट्युबऱ ( You Tuber) : तुम्हाला व्हिडीओ बनवण्यासाठी लागणाऱ्या सॉफ्टवेअरची माहिती असेल किंवा तुम्ही उत्तम प्रकारे कोणत्याही विषयावर संशोधन करून व्हिडीओ बनवण्यासाठी माहिती गोळा करू शकता, तर असे देखील जॉब्स तुम्हाला मिळू शकतात. बरेच नवीन मीडिया हाउस, न्यूज चॅनेल, नवीन बिझनेस हाऊस अशा व्यक्तींच्या शोधात असतात.

4) वेबसाईट डेव्हलपर ( Website Developer) : इंटरनेटच्या वाढत्या उपयोगामुळे प्रत्येकजण आपल्या नवीन बिझनेससाठी वेबसाईटची मदत घेत आहे. वेबसाईट डेव्हलपमेंटचे कोर्स हे आजकाल युट्युबवर सुद्धा उपलब्ध आहेत. यावरून तुम्ही या गोष्टी शिकू शकता आणि तुम्ही स्वतः डिजाईन केलेल्या 4 – 5 वेबसाईटचे नमुने दाखवून ही नोकरी सहज मिळवू शकता.

5) सोशल मिडिया मॅनेजर ( Social media manager) : सोशल मीडिया तुम्हाला नोकरीची उत्तम संधी उपलब्ध करून देऊ शकतो. जर तुमच्यात ग्राफिक्स, लिखाण, व्हिडीओ मेकींग, फोटोग्राफी यासारखे कुठलही टॅलेंट असेल तर तुमच्यासाठी कित्येक कंपन्यांच्या सोशल मीडिया विंगचे दरवाजे उघडे होऊ शकतात.

6) भाषांतर ( Translation ) : तुमचे जर इंग्रजीवर प्रभुत्व असेल आणि सोबतच अजून 2 – 3 भाषा तुम्हाला येत असतील तर तुम्ही या नोकरी बाबत विचार करू शकता. इंग्रजी जरी व्यवसायाची प्रमुख भाषा असली तरी प्रत्येकाला कंटेंट हा त्याच्या मातृभाषेतच हवा असतो. आणि जर तुम्हाला भाषांतराच काम जमत असेल तर तुम्ही यासाठी प्रयत्न करू शकता.

7) ईव्हेंट मॅनेजमेंट ( Event Management) : आपल्याकडे वर्षभर लग्न, वाढदिवस, पार्टी, समारंभ आणि बरेच कार्यक्रम चालूच असतात. पण इथे कोणालाच स्वतः उभ राहून ही सगळी तयारी करून घ्यायला वेळ नसतो आणि अशा वेळी हे सगळ काम ईव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडे सोपवले जाते. तुमच्याकडे जर दिलेलं काम वेळेत पूर्ण करण्याची, व्यवस्थीत राहण्याची आणि बोलण्याची आणि सजावटीची आवड असेल तर या क्षेत्रात देखील नोकरी मिळवता येऊ शकते.

8) बॉडी ट्रेनर किंवा जीम ट्रेनर ( Body Trainer or Jim Trainer) : अनेकांना जीमला जाणे आणि बॉडी बनवने खूप आवडते. त्यासाठी ते तासनतास जीममध्ये घाम गाळत असतात. यामुळे बॉडी बिल्डींगबाबत आणि फिटनेस बाबत त्यांना चांगलीच माहिती असते. पण काहींना जीमला जाणे जमत नाही. असे लोक घरातच जीम उघडून पर्सनल ट्रेनर ठेवतात. आणि त्यांना चांगला पगार देखील देतात. त्यामुळे जर तुम्हाला बॉडी बिल्डींग आणि फिटनेस मध्ये आवड असेल तर तुम्ही याचा विचार करू शकता.

9) मेकअप आर्टिस्ट  ( Makeup Artist ) : सध्या भारतीय चित्रपट सृष्टी मोठ्या बदलातून जात आहे. नवनवीन प्रयोगांमुळे कलाकारांची मागणी वाढली आहे आणि त्याचसोबत त्यांना मेकअप करणाऱ्या मेकअप आर्टिस्टची सुद्धा. तुमच्या अंगात जर ही कला असेल तर कुठल्याही डिग्रीशिवाय तुम्हाला ही नोकरी सहज मिळू शकेल.

10) चित्रकार ( Painter ) : चित्रकलेच्या क्षेत्रात देखील नोकरीच्या संधी सुद्धा उपलब्ध आहेत. कित्येक चित्रकार वर्तमानपत्रात कार्टूनिस्ट म्हणून काम करतात. तसेच कित्येक कंपन्यांना सोशल मीडियावर सतत दिसत राहण्यासाठी छोट्या चित्रकथेची आवश्यकता असते. तुमच्या अंगात अशी कला असेल तर तुम्ही सुद्धा अशा एखाद्या कंपनीसोबत जोडले जाऊ शकता.