NPS च्या नियमांमध्ये झाले मोठे बदल ! 5 लाखांपर्यंत रक्कम काढणे टॅक्स फ्री; 75 वर्षापर्यंत मिळेल पेंशन

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   सीनियर सिटीझन्ससाठी National Pension System (NPS) सरकारकडून चालवली जात असलेली एक शानदार स्कीम आहे. ती जास्तीत जास्त आकर्षक बनवण्यासाठी वेळोवेळी बदल होतात. आता ज्येष्ठांना जास्त पेन्शन मिळण्यासाठी PFRDA ने अनेक नवीन बदलांसाठी प्रस्ताव दिला आहे. एनपीएसबाबत अनेक नवीन बदल आपण एक-एक करून समजून घेवूयात…

1. एनपीएसमध्ये गुंतवणुकीची कक्षा वाढणार

एनपीएसमध्ये गुंतवणुकीचे कमाल वय वाढवून 70 वर्ष करण्याचा प्रस्ताव दिला आहे. सध्या ते 65 आहे.

2. वयाच्या 75 वर्षापर्यंत सुरू राहील खाते

पीएफआरडीएने त्या सबस्क्रायबर्सला सुद्धा मोठा दिलासा दिला आहे, जे 60 वर्षाच्या वयानंतर एनपीएसमध्ये सहभागी होतात, ते आता खाते 75 वर्ष वयापर्यंत सुरू ठेवू शकतात. इतर सर्व दुसर्‍या सबस्क्रायबर्ससाठी मॅच्युरिटीची मर्यादा 70 वर्ष आहे.

3. 60 च्या पुढील लोकांचा कल वाढला

पीएफआरडीएचे म्हणणे आहे की, जेव्हा आम्ही एनपीएसमध्ये एंट्रीसाठी वयोमर्यादा 60 वरून वाढवून 65 वर्ष केली तेव्हा साडेतीन वर्षाच्या काळात 15 हजार सबस्क्रायबर्सने एनपीएस उघडले, ज्यांचे वय 60 वर्षाच्या वर होते. पीएफआरडीएचे चेयरमन सुप्रतिम बंद्योपाध्याय यांनी म्हटले की, यासाठी आम्ही कमाल वयोमर्यादा आणखी वाढवण्याचा विचार केला.

4. विना एन्युटी काढू शकता 5 लाख!

याशिवााय पीएफआरडीएने हा सुद्धा प्रस्ताव दिला आहे की, असे पेन्शन फंड जे 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहेत, यामध्ये पूर्ण पैसे काढता यावेत, आतापर्यंत 2 लाखापेक्षा कमी पेन्शन फंडवालेच संपूर्ण पैसे काढू शकतात. हे पैसे काढणे टॅक्स फ्री असेल. पीएफआरडीएने चालू आर्थिक वर्षात एनपीएसमध्ये 10 लाख नवे सबस्क्रायबर्स मिळवण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. मागील वर्षी एनपीएसमधून 6 लाख नवी सबस्क्रायबर्स मिळाले होते. एनपीएस आणि अटल पेन्शन योजनेत संयुक्त प्रकारे 1 कोटी नवीन सबस्क्रायबर्स मिळण्याची अपेक्षा आहे.

5. एनपीएसमध्ये येतील गॅरंटेड रिटर्नवाले उत्पादन

पीएफआरडीएने एनपीएसअंतर्गत गॅरंटेड रिटर्नवाले प्रॉडक्ट्स आणण्याचा सुद्धा प्रस्ताव ठेवला आहे. नवी गॅरंटेड रिटर्नवाल्या प्रॉडक्टच्या डिझाईनसाठी रिक्वेस्ट फॉर प्रपोझल 15-20 दिवसात जारी केली जाईल.