SSC-RRB-IBPS : बदलतेय एसएससी-रेल्वे-बँक भरतीची पद्धत, सप्टेंबरपासून अशा होतील परीक्षा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी (एनआरए) सप्टेंबरपासून एसएससी-आयबीपीएस-आरआरबीच्या सरकारी नोकरीसाठी ऑनलाइन परीक्षा आयोजित करण्यास सुरूवात करेल. कामगार राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी बुधवारी ही घोषणा केली. एनआरए कशाप्रकारे काम करेल, निवड कशी होईल ते जाणून घेवूयात…

आता सरकारी नोकरीसाठी वेगवेगळे फॉर्म भरणे किंवा अनेक परीक्षा देण्याची आवश्यकता असणार नाही. केंद्र सरकारने वन नेशन-वन एग्झामला मंजूरी दिली होती. नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी (एनआरए) वेगवेगळ्या विभागांसाठी वेगवेगळ्या परीक्षांऐवजी एकच परीक्षा घेईल. यामध्ये गुणांच्या आधारावर तुम्ही अर्ज करू शकता.

केंद्र सरकारने नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी (एनआरए) मध्ये आरआरबी, आयबीपीएस आणि एसएससी विलिन केले होते. या सर्वामध्ये नोकरी मिळवण्यासाठी पूर्वी वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागत होत्या. परंतु याच वर्षी सप्टेंबरपासून या सर्व विभागांमध्ये नोकरीसाठी कॉमन एलिजिबिलिटी टेस्टची व्यवस्था सुरू झाली आहे.

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, सध्या सप्टेंबरपासून स्टाफ सेलेक्शन कमीशन (एसएससी), रेल्वे भरती बोर्ड (आरआरबी) आणि इन्स्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सीलेक्शन (आयबीपीएस) द्वारे विना तांत्रिक पदांसाठी घेण्यात येणार्‍या सर्व परीक्षा आता एनआरए घेईल. मात्र, भविष्यात केंद्र सरकारच्या अंतर्गत भरतीसाठी परीक्षा एनआरएकडून घेतल्या जातील.

सप्टेंबरपासून कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट (सीईटी) केवळ टीयर-1 म्हणजे स्क्रीनिंग किंवा शॉर्टलिस्ट पर्यंत परीक्षा घेईल. या परीक्षेत पास होणारे विद्यार्थी व्हॅकन्सीसाठी होणार्‍या उच्च स्तरीय परीक्षेसाठी अर्ज करू शकतील. सीईटी परीक्षा वर्षात दोन वेळा 12 भाषांमध्ये होईल. किमान वय 18 वर्ष आणि कमाल वयोमर्यादा सध्याच्या नियमांच्या अंतर्गत असेल. एससी, एसटी, ओबीसी आणि इतर श्रेणीतील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट मिळेल.

तर काही एजन्सीजने केवळ सीईटी परीक्षेच्या आधारावर थेट नोकरी देण्याचे सुद्धा संकेत दिले आहेत. भविष्यात हे शक्य होऊ शकते की, सीईटीचा स्कोअर राज्य आणि केंद्रासह खासगी क्षेत्राशी सुद्धा सामायिक केला जाईल. या टेस्टनंतर पुढील स्तराची उच्च परीक्षा होईल, ज्यामध्ये मेडिकल टेस्ट, इंटरव्ह्यू, फिजिकल टेस्टचा सुद्धा समावेश असेल.

वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रतेसाठी वेगळी सीईटी परीक्षा आयोजित होईल. आता एकाच अभ्यासक्रमावर तीन लेव्हल महणजे 10वी, 12वी आणि ग्रॅज्युएट स्तरावर परीक्षा आयोजित होतील. परीक्षेचा अभ्यासक्रम 10वी, 12वी आणि ग्रॅज्युएशन स्तराच्या आधारावर होईल.

यानंतर सीईटीचा स्कोअर निकाल जाहीर होण्याच्या तारखेपासून तीन वर्षापर्यंत मान्य राहील. उदाहरणार्थ जर कुणाला आपला स्कोअर वाढवायचा असेल तर सतत ही परीक्षा देऊन पुढील लेव्हलवर जाऊ शकतो. सरकारचे म्हणणे आहे की, ही परीक्षा भरती प्रकिया आणखी सोपी करण्यासाठी बनवली आहे.