इंजिनियर्ससाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी, 7 व्या वेतन आयोगानुसार पगार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ( NPCIL) ने कार्यकारी अभियांत्रिकी प्रशिक्षणार्थी / वैज्ञानिक अधिकारी यांच्या जागेवर भरती काढली असून पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. या पदांसाठी इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी / इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी / यांत्रिकी अभियांत्रिकी / सिव्हिल अभियांत्रिकी / अन्य अभियंता पदवी धारक अर्ज करू शकतात.

NPCIL पोस्ट तपशील-

निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणादरम्यान कार्यकारी अभियांत्रिकी प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्त केले जाईल. प्रशिक्षणानंतर उमेदवारांना वैज्ञानिक अधिकारी पद मिळेल. एनपीसीआयएलचे एक ‘सायंटिफिक ऑफिसर पद” अ लेवलचे आहे. यासाठी 7 व्या वेतन आयोगानुसार 10 पदे आहेत. यात प्रारंभिक मूलभूत वेतन दरमहा 56,100 रुपये असेल. याशिवाय निवड झालेल्या उमेदवारांना HRA, TA, DA, LTC असे भत्तेही मिळतील.

या पदासाठी एकूण रिक्त जागा निवडीच्या अंतिम टप्प्यावर दर्शविल्या जातील.

शैक्षणिक पात्रता-

अभियांत्रिकी पदवी धारक आणि अंतिम वर्षाचे खालील अभियांत्रिकी शाखेचे विद्यार्थी अर्ज करू शकतात-

मेकेनिकल: मेकेनिकल इंजीनियरिंग / प्रॉडक्शन इंजीनियरिंग

इलेक्ट्रॉनिक्सः इलेक्ट्रॉनिक्स आणि कंट्रोल इंजीनियरिंग / इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड इंस्ट्रुमेंटेशन इंजीनियरिंग / इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग / इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन इंजीनियरिंग / इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजीनियरिंग

इन्स्ट्रुमेंटेशन: इंस्ट्रुमेंटेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग / इंस्ट्रुमेंटेशन इंजीनियरिंग / इंस्ट्रूमेंटेशन और कंट्रोल इंजीनियरिंग

सिव्हिल: सिव्हिल इंजीनियरिंग
केमिकल: केमिकल इंजीनियरिंग
इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग / इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग, इंडस्ट्रियल और फायर सेफ्टी इंडस्ट्रियल और फायर सेफ्टी

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 एप्रिल 2020 (संभावित)

वयाची अट –
या पदांसाठी अर्जकरणाऱ्या उमेदवारांचे वय 26 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
[ OBC: 03 वर्षे सूट , SC/ST: 05 वर्षे सूट, PwD -10 वर्षे सूट]

निवड प्रक्रिया-
GATE 2020 स्कोअरच्या आधारे उमेदवारांची यादी केली जाईल. अंतिम निवड वैयक्तिक मुलाखतीच्या गुणांच्या आधारे केली जाईल.

वेबसाइट – https://npcilcareers.co.in

 

visit : policenama.com