OBC Reservation | मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्यास ओबीसी समाजाचा नकार; अन्नत्याग आंदोलन करणार

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यामध्ये सध्या वेगवेगळ्या समाजाच्या आरक्षणामुळे वातावरण तापले आहे. जालन्यामध्ये मागील 15 दिवसांपासून मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) उपोषणाला बसले असून त्यांनी सरसकट सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र (Kunbi Certificate) द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. मात्र यासाठी ओबीसी समाजाचा नकार असून ओबीसी समाज हे आरक्षण (OBC Reservation) मान्य करण्यास नकार देत आहे. जरांगे यांच्या मागणीमुळे ओबीसीचे आरक्षण कमी होईल अशी चिंता ओबीसी समाजाला लागली आहे. यामुळे आता ओबीसी समाज देखील रस्त्यावर उतरला असून ओबीसी (OBC Reservation) समन्वय समितीने औरंगाबादमध्ये अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला आहे. मराठा समाजाला (Maratha Reservation) कुणबी प्रमाणपत्र देण्यास ओबीसी समाजाचा नकार असल्याने येत्या 13 तारखेला हे आंदोलन करण्यात येणार आहे.

राज्यामध्ये अनेक समाज हे आता आरक्षणाची मागणी करत असल्यामुळे आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी ओबीसी समाजाचा नकार असल्याचे आता दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर ओबीसी समन्वय समितीची (OBC Coordination Committee) बैठक रविवारी औरंगपुऱ्यातील संत सावता महाराज मंदिरात पार पडली. माजी आमदार नारायणराव मुंडे (Former MLA Narayanarao Munde) यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमाती मधील समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यानी यावेळी उपस्थिती लावली होती. या बैठकीत अन्नत्याग आंदोलनाचा एकमताने निर्णय घेण्यात आला. तसेच जन आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यात आली. ओबीसींच्या विविध मागण्या आणि ओबीसींवर होणारा अन्याय यावर चर्चा करण्यात आली.

ओबीसी समन्वय समितीच्या वतीने ओबीसी (OBC Reservation) समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी अन्नत्याग आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. हे आंदोलन आता येत्या 13 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता शहरातील क्रांतीचौकात होणार आहे. धरणे आंदोलन, निदर्शने करून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात होणार आहे. या अन्नत्याग आंदोलनात ओबीसी समाजाने सहभागी होण्याचे आवाहन ओबीसी समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहेत.

ओबीसी समन्वय समितीच्या राज्य सरकारकडे (State Govt) काही मागण्या आहेत.
यामध्ये मराठा समाजाला सरसकट कुणबी संबोधून ओबीसी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये.
सर्व जातीची जातनिहाय जन- गणना त्वरित करण्यात यावी.
आजतागायत मराठा समाजाला कुणबी (ओबीसी) म्हणून दिलेली जातींची प्रमाणपत्रे रद्द करून संबंधित अधिकाऱ्यांवर
कारवाई देखील करावी. तसेच ओबीसी, (व्हिजेएनटी, एसबीसी – Vijnt, SBC) विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत
(Student Scholarships) महागाई निर्देशांकानुसार वाढ करण्यात यावी आणि ज्या व्यावसायिक अभ्यासक्रमांची
शिष्यवृत्ती बंद करण्यात आली आहे. ती त्वरित चालू करण्यात यावी. सरकारी उद्योगांचे खाजगीकरण थांबून सरकारी नोकऱ्यांच्या खासगीकरणाचा अध्यादेश तत्काळ रद्द करण्यात यावा, अशा मागण्या ओबीसी समन्वय समितीच्या आहेत. या आंदोलनादरम्यान मांडण्यात येणार आहे.

राज्य सरकारकडून याआधीच ओबीसी समजाने काळजी करु नये आणि सर्वांनी सहकार्य करावे असे सांगण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे.
मात्र, इतर कोणत्याही समाजाचा आरक्षण कमी न करता हे आरक्षण दिले जाणार आहे.
मात्र, दोन समाजात वाद होईल असे कोणतेही निर्णय घेतले जाणार नाही.
त्यामुळे ओबीसी समाजाने आंदोलन करण्याची गरज नाही, कारण त्यांच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही.”
असा विश्वास मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनी देखील व्यक्त केला होता.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

BJP on Bhaskar Jadhav | ‘तोंड उघडले की गटारगंगा!’ भास्कर जाधवांच्या टीकेवर भाजपचा पलटवार

Pune Crime News | दाजीचा खून करुन मेव्हण्याची आत्महत्या, पुण्यातील खळबळजनक घटना