अश्लिलता तुमच्या नजरेत असते फोटोत नाही

कोची : वृत्तसंस्था

कोणाला एखादा चित्रात अश्लिलता दिसत असेल तर दुस-या व्यक्तीला त्यात कलाकारी दिसू शकते. एखाद्याला लेखात आक्षेप असू शकतो, त्याचवेळी दुस-याला तो गीता सारखे वाटू शकते, अशा शब्दात टिपण्णी करत केरळ हायकोर्टाने मलयालम भाषेतील मासिकाविरुद्ध अश्लिलतेचा आरोप करणारी याचिका फेटाळून लावली.

मलयालम भाषेतील ‘गृहलक्ष्मी’ या मासिकाच्या मुखपृष्ठावर तान्ह्या मुलाला स्तनपान करीत असलेल्या महिला मॉडेलचे छायाचित्र छापले होते. त्यावर अश्लिलतेचा आरोप करत कारवाई करण्याची मागणी केली गेली होती. हायकोर्टाच्या दोन सदस्य खंडपीठाने ही याचिका फेटाळताना खूप प्रयत्न केल्यानंतरही आम्हाला त्यात छायाचित्रात अश्लिल असे काही दिसले नाही. या छायाचित्राला दिलेले शिर्षकही आपत्तीजनक नसल्याचा निर्वाळा दिला.

त्यासाठी न्यायमूर्तींनी  प्रसिद्ध चित्रकार राजा रवी वर्मा यांच्या चित्रांचा दाखला दिला. राजा रवी वर्मा यांच्या पेंटिंग अनेकांना अश्लिल वाटू शकतात. मात्र, बहुसंख्यांना त्यात कलाकाराची अदाकारी दिसून येते. जशी सुदंरता तुमच्या डोळ्यात असते, कदाचित तशीच अश्लिलता पाहणा-यांच्या नजरेत असते.