मोनालिसा बागलचा ‘करंट’ ! सिनेमाच्या पोस्टरवरील ‘बॅकलेस’ फोटोनं सोशलवर खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अनुप जगदाळे (Anup Jagdale) डायरेक्टेड आणि ॲक्ट्रेस मोनालिसा बागलची (Monalisa Bagal) मुख्य भूमिका असलेला करंट (Karant) हा सिनेमा 21 मे 2021 रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं टीजर पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे.

करंट या सिनेमाचा टीजर पोस्टर समोर आल्यानंतर या पोस्टरवरील मोनालिसाच्या बॅकलेस फोटोची जोरदार चर्चा सुरू आहे. या टीजर पोस्टरवर खास टॅगलाईनही दिसत आहे. यंदा उन्हाळ्यात गरमी वाढणार असं यावर लिहिलं आहे. यावरून असाही अंदाज व्यक्त केला जात आहे की, या सिनेमात हॉट काहीतरी असणार आहे.

सिनेमाची कथा ही नामदेव मुरकुटे यांनी लिहिली आहे, तर रेहा फिल्म प्रॉडक्शनच्या दीक्षा युवराज सुरवाडे यांनी करंट या सिनेमाची निर्मिती केली आहे.

https://www.instagram.com/p/CHHRbMiLyxx/

डायरेक्टर अनुप जगदाळे म्हणतात, सिनेमा करताना आम्ही दोनच नियम पाळतो, एक म्हणजे आमचा सिनेमा मनोरंजन करणारा असतो आणि पहिला नियम मी कधीच विसरत नसतो.

https://www.instagram.com/p/CDDWqSdjhgv/

याशिवाय लवकरच सिनेमातील स्टार कास्ट आणि इतर माहिती समोर येईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे. परंतु पोस्टर पाहून चाहत्यांची उत्सुकता आणखी ताणली गेली आहे. यात शंका नाही. सध्या करंट सिनेमाचं हे हॉट टीजर पोस्टर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.