बोट दुर्घटनेतील बेपत्ता सिद्देश पवारचा मृतदेह सापडला

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन – मुंबईजवळ अरबी समुद्रात आयोजित शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमाला जाणारी स्पीड बोट खडकावर आपटून बुडाली. आज सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास झाला ही घटना घडली. दरम्यान सिद्धेश पवार हा कार्यकर्ता बेपत्ता असल्याची माहिती आपत्कालीन यंत्रणेने दिली होती. धक्कादायक म्हणजे दुर्घटनाग्रस्त बोटीत एक मृतदेह आढळला असून तो सिद्देश पवार याचा असल्याचे स्पष्ट झालेले आहे. अतिशय खेदाची गोष्ट म्हणजे या तरूणाचे चार महिन्यांपूर्वीच कोल्हापूरमध्ये लग्न झाले होते. पेशाने सिद्धेश सी.ए. होता. त्यामुळे सिद्धेशच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.
नेमके काय घडले होते ?
मूळचा मुंबईचाच असलेला सिद्धेश आपल्या मामांबरोबर शिवस्मारकाच्या शुभारंभ सोहळ्यासाठी गेला होता. अपघातानंतर ३ पैकी २ जणांना वाचविण्यात आले असून सिद्धेश मात्र बेपत्ता झाला होता. नौदलाच्या रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान चार तासांनी सिद्धेश पवारचा मृतदेह अपघातग्रस्त बोटीतच आढळून आला.
दुपारी तीन वाजता गिरगाव चौपाटीजवळ अरबी समुद्रात  शिवस्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता. यासाठी तीन ते चार बोटी गेट वे ऑफ इंडिया वरून रवाना झाल्या होत्या. मात्र या कार्यक्रमाला जाणारी शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांची स्पीडबोट  शिवस्मारकारकाजवळ आली असता खडकाला  धडकली आणि या बोटीत पाणी भरण्यास सुरुवात झाली. अपघातानंतर बोट समुद्रात बुडाली. त्यानंतर जवळपास सव्वा चार वाजता कोस्टगार्डला कॉल करण्यात आला . तात्काळ आपत्ती व्यवस्थापन करणारी टीम याठिकाणी पोहचली. या बोटीवर असलेले शिवसंग्रामचे 18 ते 20 कार्यकर्ते सुखरुप आहेत.
अपघातानंतर पायाभरणी कार्यक्रम रद्द करण्यात आला.  जी बोट उलटली त्यात मुख्य सचिव आणि भूषण गगराणी होते . त्यांना देखील सुखरूप स्थळी नेण्यात आले होते.
असे झाले बचावकार्य
तटरक्षक दलाची दोन हेलिकॉप्टर बचावासाठी घटनास्थळी दाखल झाली होती. अपघातावेळी स्पीड बोटमध्ये असलेल्या व्यक्तींना वेळीच बाहेर काढल्याचं शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी सांगितले. दुसरी बोट घटनास्थळी गेल्यानंतर बुडणाऱ्या बोटीतील प्रवाशांची तातडीने सुटका करण्यात आली. तसंच दोन बोटींच्या मदतीने बचावकार्य करण्यात आलं. याशिवाय अग्निशमन दलाचे जवानही किनाऱ्यावर पोहचले होते.