OneRailOneHelpline : होळीसाठी घरी जाणार असाल तर उपयोगी येतील ‘हे’ नंबर, प्रवासात होणार नाही कोणताही त्रास

नवी दिल्ली : रेल्वेशी संबंधीत सामान्य चौकशी असो, ट्रेन किंवा सुविधाबाबत एखादी तक्रार करायची असेल किंवा एखाद्या रेल्वे दुर्घटनेबाबत माहिती घ्यायची असेल, तर आता तुम्हाला अस्वस्थ होण्याची आवश्यकता नाही. भारतीय रेल्वेच्या वन रेल्वे वन वन हेल्पलाईन सुविधेद्वारे तुम्ही अनेक प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे आणि तक्रारींवर उत्तर मिळवू शकता. मागच्या वर्षीच रेल्वेने 139 नंबरची ही हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे. आता रेल्वेने ती मोबाइल अ‍ॅपच्या रूपात सुद्धा डेव्हलप केली असून आता RailMadad नावाने ही सेवा उपलब्ध आहे.

आयव्हीआरएस सिस्टमवर मिळेल रिस्पॉन्स
या व्यवस्थेंतर्गत हेल्पलाईन 182 सोडून रेल्वेच्या सर्व हेल्पलाइन नंबरच्या ऐवजी एकच नंबर ‘139’ करण्यात आला आहे. यावर 12 भाषांमध्ये प्रतिसाद मिळेल. ही आयव्हीआरएस म्हणजे इंटरॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स प्रणालीवर आधारित आहे. यावर कोणत्याही फोनवरून कॉल करू शकता. सर्वप्रथम भाषा निवडावी लागेल. यानंतर सुरक्षा मदतीसाठी 1 आणि सामान्य चौकशीसाठी 2 क्रमांक दाबावा लागेल. इतरही पर्याय आहेत. तक्रारीवर कोणती कारवाई झाली हे जाणून घेण्यासाठी 9 नंबर दाबावा लागेल. तर * (स्टार) दाबून कॉल सेंटर एग्झिक्यूटिव्हशी बोलता येईल.

कोणत्या सुविधेसाठी कोणता नंबर दाबावा लागेल

1. सुरक्षा आणि वैद्यकीय मदतीसाठी 1
2. सामान्य चौकशीसाठी 2
3. खाण्या-पिण्याच्या संबंधी तक्रारीसाठी 3
4. सामान्य तक्रारींच्या सुनावणीसाठी 4
5. सतर्कता किंवा भ्रष्टाचार संबंधी तक्रारीसाठी 5
6. पार्सल किंवा फ्रेट संबंधी माहितीसाठी 6
7. नोंदलेल्या तक्रारीची स्थिती जाणून घेण्यासाठी 9

मोबाइल अ‍ॅपद्वारे सुद्धा मिळेल मदत
भारतीय रेल्वेने RailMadad नावाचे अ‍ॅपसुद्धा जारी केले आहे. या अ‍ॅपद्वारे वरील सर्व सुविधांचा लाभ घेऊ शकता. याशिवाय तुम्ही railmadad.indianrailways.gov.in/madad/final/home.jsp वर सुद्धा आपली तक्रार नोंदवू शकता.