Online Banking | ‘या’ 7 ऑनलाइन धोकादायक बनावट बँकिंग लिंकवर चुकूनही करू नका क्लिक, सरकारने सुद्धा केले सावध; जाणून घ्या डिटेल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Online Banking | इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणार्‍या भारतीय कम्प्यूटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-IN) ने भारतीय नागरिकांसाठी एक नवीन प्रकारच्या सायबर हल्ल्याबाबत इशारा जारी केला आहे. हा सायबर हल्ला ऑनलाइन (Online Banking) बँकिंगला टार्गेट करून केला जात आहे.

सरकारकडून एक अ‍ॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे ज्यामध्ये म्हटले आहे की, सायबर हल्ला करणारे भारतात लोकप्रिय आणि मोठ्या बँकांच्या इंटरनेट बँकिंग वेबसाइटप्रमाणे दिसणार्‍या फिशिंग वेबसाइट बनवतात आणि फसवणुकीसाठी त्यांचा वापर करतात. ते यासाठी ’एनग्रोक’ प्लॅटफॉर्मचा वापर करत आहेत.

अशा प्रकरणांमध्ये शक्य आहे की, तुम्हाला एखादा मेसेज मिळेल ज्यामध्ये लिहिले असू शकते की, प्रिय ग्राहक, तुमचे xxx बँक खाते निलंबित करण्यात आले आहे. कृपया पुन्हा केवायसी पडताळणी अपडेटसाठी येथे या लिंकवर क्लिक करा. ही लिंक काहीशी अशी असू शकते – http://446bdf227fc4.ngrok.io/xxxbank. तुम्ही यावर क्लिक करताच, तुमच्या बँकिंग लॉगइन डिटेल आणि मोबाइल नंबर चोरी केला जाऊ शकतो.

एकदा हे चोरल्यानंतर सायबर गुन्हेगार बँकेच्या खर्‍या वेबसाइटवर तुमच्या डिटेल टाकून ओटीपी जेनरेट करतात. हा ओटोपी तुमच्या नंबरवर येईल आणि हा ओटीपी तुम्ही बनावट वेबसाइट टाकताच सायबर गुन्हेगारांना हे समजेल आणि याचा वापर करून ते खात्यातून पैसे चोरतील. आज आपण त्या सात प्रकारच्या लिंकबाबत जाणून घेणार आहोत ज्यांच्यापासून दूर राहणे आवश्यक आहे.

 

1. या बनावट लिंकच्या शेवटी बँकेचे नाव असू शकते

http:// 1a4fa3e03758. ngrok [.] io/xxxbank अशा प्रकारची लिंक दिसू शकते. खर्‍या बँकेचे नाव लिंकमध्ये सर्वात पुढे असते.

2. यूजर्सला फसवण्यासाठी लिंकमध्ये असू शकतो केवायसीचा उल्लेख

ही लिंक काही अशी दिसते – http://1e2cded18ece.ngrok[.]io/xxxbank/full-kyc.php.

3. बहुतांश फेक लिंक HTTP प्रोटोकॉलवर

ही काहीशी अशी दिसते – http://1d68ab24386.ngrok[.]io/xxxbank/. सर्व बँकांच्या लिंक HTTPS आधारित असतात.

4. काही लिंक ’एनग्रोक’ HTTPS आधारित

काही बनावट लिंक https://05388db121b8.sa.ngrok[.]io/xxxbank/ असू शकतात, ज्या HTTPS प्रोटोकॉल आधारित असतील. मात्र बनावट लिंकमध्ये बँकेचे नाव शेवटी असते.

5. बहुतांश बनावट लिंकमध्ये नंबर आणि लेटर

या फिशिंग लिंक काहीशा अशा दिसतात- http://1e61c47328d5.ngrok[.]io/xxxbank

6. फेक ऑनलाइन बँकिंग लिंक छोट्या सुद्धा असू शकतात

अशा केसमध्ये एसएमएसद्वारे मिळालेल्या लिंक छोट्या असतात. मात्र तुम्ही तिच्यावर क्लिक करताच ती मोठी होते. ही लिंक अशी दिसते – https://0936734b982b.ngrok[.]io/xxxbank/

7. तर लिंकवर बँकेचे नाव दुसरे

अशा केसेसमध्ये नेहमी हे सुद्धा आढळून येईल की लिंक तिच आहे परंतु बँकेचे नाव शेवटी बदललेले आहे. असे काही दिसले तर सावध व्हा.

 

Web Title : Online Banking | online banking 7 dangerous fishing and fake links to avoid how to detect all details

Neeraj Chopra | ’हिंदी में पूछ लो जी’….नीरज चोपडाने जेव्हा अँकरला म्हटले, व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल (व्हिडिओ)

Dr. Pratibha Shinde | वाई नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदेंना उच्च न्यायालयाचा तात्पुरता दिलासा

Crime News | 3 महिन्यांपूर्वी प्रेम विवाह झालेल्या तरूणाने केली आत्महत्या, प्रचंड खळबळ