Online financial fraud । ऑनलाइन फसवणूक झाल्यास कुठं, कशी तक्रार कराल ?, जाणून घ्या तक्रार करण्यासाठी आवश्यक गोष्टी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Online financial fraud । खासगी सरकारी क्षेत्रात (Private public sector) बहुतांश कामकाज हे डिजिटल (Digital) स्वरूपात केले जातात. सध्या डिजिटल (Digital) व्यवहारात वाढ झाली आहे. कोरोनाच्या महामारीत तर डिजिटल व्यवहारास प्राधान्य दिल आहे. मात्र अशा या ऑनलाइन स्वरूपाच्या व्यवहारामुळे आर्थिक फसवणुकीचे (Online financial fraud) प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे अनेक लोक ऑनलाइन फसवणुकीच्या जाळ्यात सापडतात. अशी ऑनलाइन फसवणूक झाल्यास पुढं काय करावं? हे अनेक लोकांना माहित नसतं. बहुतेक लोक फसवणुकीमध्ये छोटी रक्कम जर असेल तर जाऊ दे म्हणून विषय सोडून देत असतात. मात्र, विशेष म्हणजे अशा प्रकारची फसवणूक झाल्यानंतर न घाबरता योग्य मार्गाने तक्रार केल्यास तुमची रक्कम परत मिळू शकते.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

काही चुकीमुळे ऑनलाइन आर्थिक फसवणुक (Online financial fraud) झाली असल्यास तर फसवणूक झालेली ती व्यक्ती आपली रक्कम परत (Refund) मिळावी यासाठी प्रयत्न करू परंतु तुमची रक्कम परत मिळायची असेल तर तुम्ही याबाबत तक्रार करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे ऑनलाइन आर्थिक फसवणूक (Online financial fraud) झाल्यास याबाबत तक्रार कशी करावी ? कुठे करावी ? या बाबी काळात नाहीत. यामुळे न घाबरता रिफंड (Refund) मिळवण्यासाठी कोणती पद्धत आहे? आणि कोणते कायदेशीर आहेत? हे समजणे महत्वाचे आहे.

RBI चा नियम काय ?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) नियमानुसार जर बेकायदेशीर ऑनलाइन व्यवहाराच्या माध्यमातून फसवणूक झाली असेल तर यासाठी फसवणूक झालेल्या व्यक्तीला जबाबदार धरलं जात नाही. जर या फसवणुकीबाबत तात्काळ आपल्या बँकेला याप्रकरणी माहिती दिली तर कायदेशीर मार्गाने जाता येणे शक्य असतं.

…म्हणून अजितदादांवर गुन्हा दाखल करण्याचा प्रश्नच नाही – जयंत पाटील

याप्रकरणी तक्रार कुठे करावी ?
ज्या व्यक्तीला ऑनलाइनच्या माध्यमातून फसवणूक (Online financial fraud) झाली आहे. त्या व्यक्तीच्या अकाऊंटमधून रक्कम दुसऱ्या अकाउंटवर पाठवली आली असेल तर फसवणूक झाल्यापासून 3 दिवसांच्या आत तक्रार करणे गरजेचे असते. फसवणूक झाल्यानंतर https://www.cybercrime.gov.in/ अथवा स्थानिक पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करता येते. याप्रकरणी वेबसाईटवर तक्रार नोंदवल्यावर तक्रारदाराला SMS द्वारे माहिती दिली जाते. दरम्यान, तक्रार दाखल केल्यानंतर एक संदर्भ क्रमांक देखील दिला जातो. ज्याद्वारे तक्रारदाराला तपासा बाबत माहिती मिळू शकते.

10 दिवसात मिळू शकते रक्कम परत –
ज्या व्यक्तीची फसवणूक झाली आहे. (Online financial fraud) त्याने योग्य मार्गाने तक्रार नोंदवल्यास त्याचे मोठं नुकसान होत नाही. नियमांनुसार त्या व्यक्तीला 10 दिवसांमध्ये रिफंड अर्थात गेलेली रक्कम परत मिळू शकते. फसवणूक झाल्यानंतर बँकेमध्ये फोन करुन ऑनलाइन व्यवहार तूर्त स्थगित करण्याबरोबरच प्रत्यक्ष बँकेत जाऊन लेखी तक्रार देणे देखील महत्वाचे असत. तसेच, सायबर गुन्ह्यांअंतर्गत जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवणे देखील फायद्याचे असते.

फोन कॉलवरुन तक्रार अशी नोंदवा –
ज्या व्यक्तीची ऑनलाईन फसवणूक झाली (Online financial fraud) आहे त्याने सायबर फसवणुकीसंदर्भात आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून राष्ट्रीय हेल्पलाईन 155260 या क्रमांकावर संपर्क करावा. सध्या ही सेवा फक्त छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये या 7 राज्यांमध्ये उपलब्ध असली तरी ती लवकरच अन्य राज्यांमध्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये देखील प्रारंभ करण्यात येणार आहे.

Pune News | समाजसेवक असल्याचे भासवणार्‍यांना पोलिसांकडून खंडणीच्या गुन्ह्यात अटक

E-mail वरुन फसवणूक झाल्यास काय कराल ? तक्रारीत या गोष्टी आवश्यक –
नक्की काय घडलं आहे याची सविस्तर माहिती अर्थात लेखी तक्रार.

ज्या E-mail द्वारे फसवणूक झाली त्याची कॉपी.

ज्यांना E-mail आला त्यांच्या E-mail आयडीवरुनच ही कॉपी देण्यात यावी.

E-mail चा विषय काय होता त्याची सविस्तर माहिती देणे.

पोलिसांकडे तक्रार नोंदवायला जाताना डिजीटल आणि प्रिंट काढून या सर्व कॉपी घेऊन जाणे आवश्यक.

सॉफ्ट कॉपी या CD मधून पोलिसांकडे द्याव्या लागतात.

Sanjay Raut । राज्य सरकार 5 वर्ष चालणार, तिन्ही पक्ष मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी – संजय राऊत

सोशल मीडियावरुन फसवणूक झाल्यास काय कराल ? तक्रारीत या गोष्टी आवश्यक –
ज्या मजकुराद्वारे फसवणूक झाली तो मजकूर अथवा प्रोफाइलचे स्क्रीनशॉर्ट देणे.

संबंधित मजकुराची URL स्क्रीनशॉर्ट स्वरुपात देणे.

पोलिसांकडे तक्रार नोंदवायला जाताना डिजीटल आणि प्रिंट काढून या सर्व कॉपी घेऊन जाव्यात.

सॉफ्ट कॉपी या CD मधून पोलिसांकडे द्याव्या लागतात.

App वरुन फसणूक झाल्यास काय कराल ? तक्रारीत या गोष्टी आवश्यक –
ज्या अ‍ॅपवरुन फसवणूक झाली त्याचे स्क्रीनशॉर्ट आणि ते कुठून डाऊनलोड केले याची माहिती देणे.

फसवणूक झालेल्या व्यक्तीच्या बँकेचे स्टेटमेंट.

– सर्व डिजीटल पुरव्यांचे Soft and hard copy तक्रार करता पोलिसांकडे दाखल करणे आवश्यक.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Titel : Online financial fraud Find out where and how to report online fraud

हे देखील वाचा

Gold Price Today | 1600 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, जाणून घ्या आजचा दर