×
Homeताज्या बातम्या10 वी पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांना ITI प्रवेशाची संधी

10 वी पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांना ITI प्रवेशाची संधी

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन –   नोव्हेंबर-डिसेंबर 2020 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. दहावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेयचा असेल तर अशा इच्छुक उमेदवारांना संचालनालयाच्या वतीने प्रवेशाची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अशी माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दीपेंद्र सिंह कुशावह यांनी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.

सद्य:स्थितीत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ऑगस्ट 2020 सत्रातील प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येत आहे. त्यानुसार, राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण प्रवेश पूर्ण क्षमतेने होणे, प्रवेश अर्जात दुरुस्ती करणे व इयत्ता दहावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्रवेशाची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रवेश अर्ज सादर करणे व प्रवेश अर्जात दुरुस्ती करण्याची सुविधा 1 जानेवारी 2021 पासून संचालनायाच्या http://admission.dvet.gov.in यासंकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

प्रवेशाचे वेळापत्र

– ऑनलाइन प्रवेश अर्ज भरणे व अर्जात दुरुस्ती करणे – 1 जानेवारी ते 4 जानेवारी 2021 सायंकाळी 5 पर्यंत

– गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे – 5 जानेवारी 2021 सायंकाळी 5 पर्यंत

– संस्थास्तरीय समुपदेशन फेरी – 1 जानेवारी ते 7 जानेवारी 2021 सायंकाळी 5 पर्यंत

– खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील संस्था स्तरावरील प्रवेश – 8 जानेवारी ते 2021 सायंकाळी 5 पर्यंत

प्रवेश शुल्क

अराखीव प्रवर्ग उमेदवार – 150 रुपये
राखीव प्रवर्ग उमेदवार – 100 रुपये
महाराष्ट्र राज्याबाहेरील उमेदवार – 300 रुपये
अनिवासी भारतीय उमेदवार – 500 रुपये

Must Read
Related News