Oscars 2023 | 62 वर्षांनी ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात होणार ‘हा’ मोठा बदल; सेलिब्रिटी मात्र नाराज

पोलीसनामा ऑनलाइन : भारताबरोबरच भारताबाहेर देखील पुरस्कार सोहळ्याला खूप जास्त महत्त्व आहे. आता येत्या 12 मार्चला ऑस्कर (Oscars 2023) पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. हा पुरस्कार सोहळा म्हटलं की रेड कार्पेट हा आलाच. कोणताही पुरस्कार सोहळ्यात रेड कार्पेट हे आकर्षणाचे विषय असते. पुरस्कार सोहळा छोटा किंवा मोठा असो ग्लॅमरस लुकने रेड कार्पेटवर सेलिब्रिटी चाहत्यांना घायाळ करण्यात कोणतीच कसर सोडत नाहीत. मात्र यंदाच्या 95 व्या ऑस्कर (Oscars 2023) पुरस्कार सोहळ्यामध्ये रेड कार्पेट नसणार आहे.

यंदाचा 95 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडणार आहे. या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील रेड कार्पेटवर चालण्यासाठी सेलिब्रिटी नेहमीच सज्ज असतात. रेड कार्पेटवर आपण इतरांपेक्षा हटके कसे दिसू यासाठी सेलिब्रिटी चांगल्याच तयारीत असतात. या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची जगभरातील अनेक सिनेमेप्रेमी, सिनेविश्वातील कलाकार मंडळी आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात रेड कार्पेट नसणार आहे. या कार्पेटचा रंग बदलण्यात आला आहे. कार्पेटचा रंग बदलण्यात आल्याने सेलिब्रिटी मात्र नाराज झाल्याचे दिसत आहेत.

1961 सालापासून ऑस्कर पुरस्कार (Oscars 2023) सोहळ्यात रेड कार्पेटचा समावेश झाला आहे.
1961 पासून म्हणजेच 33 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यापासून दरवर्षी रेड कार्पेट हातरले जाते आणि
अनेक कलाकार या रेड कार्पेटवर चालण्यासाठी खूपच उत्सुक असतात. मात्र तब्बल 62 वर्षांनी या कार्पेटचा रंग बदलण्यात आला आहे. ऑस्करचे नियोजन करणाऱ्या अ‍ॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर्सने याबाबतची माहिती दिली. त्यावेळी त्यांनी सांगितले की यावेळी लाल रंगाऐवजी कार्पेट हा पांढऱ्या रंगाचा निवडला आहे.

भारतीयांसाठी यंदाचा ऑस्कर 2023 हा पुरस्कार सोहळा खूपच महत्त्वाचा आहे.
यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात एस.एस राजामौलीच्या ‘आरआरआर’ सिनेमातील नाटू नाटू गाण्याला
ऑस्करसाठी नामांकन मिळाले आहे. तर सध्या भारतीय सिनेप्रेमींचे देखील या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याकडे
लक्ष लागले आहे. येत्या 12 मार्चला ऑस्कर पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.
भारतीयांना 13 मार्चला पहाटे 5.30 वाजता हा पुरस्कार सोहळा पाहता येणार आहे.

Web Title : Oscars 2023 | oscars 2023 for the first time in 62 years the color of the carpet at the oscars will not be red

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Palghar Crime News | चुलत भावाच्या हळदीला आलेल्या पाहुण्यांना घरी सोडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा अपघातात मृत्यू

Satara Crime News | येणपेमध्ये रिक्षा व ट्रॅक्टरचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू