Oscars Award 2023 | ऑस्करने मोडला रेकॉर्ड ! कोणत्याही वाद-विवादाशिवाय पार पडला यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा

पोलीसनामा ऑनलाइन : Oscars Award 2023 | प्रतिष्ठित असा समजला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा आज लॉस एंजेलिसमधल्या डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. यंदाच्या ऑस्कर मध्ये ‘आरआरआर’ या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने चांगलीच बाजी मारली. या 95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. यंदाच्या ऑस्कर सोहळ्याने इतिहास रचला आहे. त्यातील महत्त्वाचा इतिहास म्हणजे या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात कोणताही वाद विवाद झाला नाही. (Oscars Award 2023)

2023 ऑस्कर सोहळा संपन्न झाल्यानंतर यंदाचा पुरस्कार सोहळा शांततेत पार पडल्याची विशेष नोंद घेण्यात आली आहे. पहिल्यांदाच या पुरस्कार सोहळ्यात कोणताच वाद झाला नसल्याने यंदाच्या पुरस्कार सोहळ्याची नोंद घेण्यात आली आहे. मागच्या वर्षीच्या म्हणजेच 94 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील थप्पड प्रकरण हे खूपच चांगले गाजले होते. जाणून घेऊया अशाच वादग्रस्त ऑस्कर पुरस्काराबाबत..

जेव्हा मंचावर सूत्रसंचालकाला थप्पड मारण्यात आले
ऑस्कर 2022च्या मंचावर कॉमेडियन ख्रिस रॉकला अभिनेता विल स्मिथने जोरदार थप्पड मारली होती आणि
ही गोष्ट खूपच चर्चेत आली होती. तर ख्रिसने स्मिथची पत्नी जाडा पिंकेट-स्मिथच्या टक्कल पडण्याची खिल्ली उडवली होती. यावेळी ख्रिसने गमतीने त्याच्या टक्कल पडण्याचा संबंध एका हॉलीवुड चित्रपटाशी जोडला.
ख्रिसची गोष्ट जाडा आणि विल स्मिथला रुचली नाही. अशा वेळेत शोच्या मध्यातच विल स्मिथने स्टेजवर
जाऊन ख्रिसला थप्पड मारली होती. (Oscars Award 2023)

चित्रपटाची चुकीची घोषणा
ऑस्कर 2017 पुरस्कार दरम्यानतील ही घटना फारच रंगली होती. सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार देण्यासाठी फेय ड्युनावे आणि वॉर्न बिट्टी हे जेव्हा मंचावर आले यावेळी त्यांनी सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून लाला लँड या सिनेमाची घोषणा केली होती. मात्र सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मूनलाईट या सिनेमाला दिला जाणार होता. त्यामुळे 2017 च्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात चांगलाच गोंधळ उडाला. पण नंतर ही चूक देखील सुधारण्यात आली होती.

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांंबद्दल बोलल्या गेल्या आक्षेपार्ह गोष्टी
‘बॉलिंग फॉर कोलंबाइन’ या सिनेमाचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मूर स्टेजवर आले.
यावेळी त्यांनी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या बद्दल आक्षेपार्ह गोष्ट बोलले होते.
ही घटना ऑस्कर 2003 मध्ये घडली होती.

अभिनेत्री अँजेलिना भावाला लीप लॉक केल्यामुळे सापडली अडचणीत
ऑस्कर 2000 च्या पुरस्कार सोहळ्या दरम्यान अँजेलिना जोलीला गर्ल इंटरप्टेड या चित्रपटासाठी तिला
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. मात्र पुरस्कार सोहळ्याआधी अँजेलिनाने रेड कार्पेट
वरच भावाला लिप लॉक केले होते आणि याच कारणामुळे ती चांगलीच वादाच्या भोवऱ्यात अडकली होती.

Web Title :- Oscars Award 2023 | oscars 2023 oscar shocking moments from adrien broady kissing berry to will smith slap to chris rock

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kalyan Crime News | तरुणीला वाचवायला गेलेल्या तरुणांना बॅट-दांडक्यांनी बेदम मारहाण

Old Pension Scheme In Maharashtra | कर्मचारी संपाबाबत तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक; संपावर जाण्याचा निर्णय मागे घ्यावा- मुख्यमंत्र्यांचे कर्मचारी संघटनांना आवाहन