Osmanabad Crime | महिला पोलीस अधिकाऱ्याला अपार्टमेंटमच्या गच्चीवरुन खाली दिले फेकून, पोलिस नाईकास 7 वर्षाचा कारवास

उस्मानाबाद न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Osmanabad Crime | अपार्टमेंटमच्या चौथ्या मजल्यावरील गच्चीवरून एका महिला पोलीस अधिकाऱ्याला फेकून देवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलीस नाईक आशिष ढाकणे (Ashish Dhakne) यास 7 वर्ष कारवासाची शिक्षा ठोठावन्यात आली आहे. ही धक्कादायक घटना उस्मानाबाद शहरात घडली (Osmanabad Crime) होती. याप्रकरणी सुनावणी दरम्यान आरोपीस कारावासासह 25 हजार दंडाचीही शिक्षा सुनावन्यात आली आहे. उस्मानाबाद जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एन एच मखरे (Judge N. H. Makhre) यांनी ही शिक्षा सुनावली आहे. पीडित महिला पोलीस अधिकाऱ्याला न्याय मिळाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, उस्मानाबाद जिल्हा पोलीस दलात कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) मनिषा रामदास गिरी (Manisha Ramdas Giri) या प्लस हॉस्पीटल शेजारील एका अपार्टमेंटमध्ये राहत होत्या.
पोलीस दलातील चालक कॉन्स्टेबल आशिष ढाकणे यांच्याशी त्यांचे सलोख्याचे नातेसंबध होते.
या नातेसंबंधांत संशयावरून मनीषा गिरी आणि कॉन्स्टेबल ढाकणे यांच्यामध्ये कुरबुर झाल्याचे समोर येते.
30 जून 2017 मध्ये सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आशिष ढाकणे हा पोलीस अधिकारी मनीषा गिरी (Police officer Manisha Giri) यांच्या फ्लॅटवर गेला तेव्हा तेथे दोघात वाद झाला.
त्यातच संतप्त झालेल्या ढाकणे यांनी गिरी याना अपार्टमेंटमधील चौथ्या मजल्यावरील गच्चीवरून खाली जमिनीवर फेकून दिले. यात मनीषा गिरी या गंभीर जखमी झाल्या.
तात्काळ त्यांना जवळच्या पल्स हॉस्पीटल मध्ये हलवण्यात आले.
दरम्यान याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात (Anand Nagar Police station) महिला पोलीस अधिकारी मनीषा गिरी यांच्याविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी आयपीसी कलम 309 नुसार गुन्हा नोंद केला होता.

मात्र याप्रकरणी मनीषा गिरी (Manisha Giri) यांचे वडील रामदास, आई आणि भाऊ यांनी मनिषा यांना ढाकणे याने संशयाच्या कारणावरून गच्चीवरून टाकून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा जबाब पोलीस ठाण्यात नोंदविला.
यावरून आनंदनगर पोलीस ठाण्यात (Anand Nagar Police station) ढाकणे याच्याविरुध्द IPC कलम 307 अन्वये गुन्हा नोंद केला होता़.
याप्रकरणी तपास पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन (SP Raj Tilak Roshan) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सुरु केला.
घटनास्थळी सर्वात प्रथम पाहिलेला एक मुलगा, उपचारासाठी दाखल केलेले अन्य लोक, मनिषा गिरी, तिचे वडील, आई, भाऊ, नातेवाईक या सर्वांचा जबाब नोंदविला.
यावरून ढाकणे विरुद्ध कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले.

या दरम्यान, या चर्चेत असणाऱ्या या प्रकरणात उपविभागीय पोलीस अधिकारी मोतीचंद
(Sub-Divisional Police Officer Motichand Rathod) राठोड यांनी
उत्कृष्टरित्या तपास केल्याने हे प्रकरण आत्महत्याचे नसून हा एक कटस्थ हत्येचा प्रयत्न
असल्याचे निष्पन्न झाले.
जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. शरद जाधवर यांनी या प्रकरणी तब्बल 24 साक्षीदार तपासत
बाजू मांडली आहे.
साक्षीदारांची साक्ष, उप विभागीय पोलीस अधिकारी तथा तपास अधिकारी राठोड,
पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी सादर केलेले पुरावे, यानुसार कोर्टाने आरोपी ढाकणे
याला शिक्षा सुनावली आहे.

Web Title : Osmanabad Crime | psi woman thrown from terrace court sentenced seven years jail to police naik in osmanabad

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Shilpa Shetty | …म्हणून राज कुंद्राने भेट दिलेला बुर्ज खलिफामधील 50 कोटींचा फ्लॅट शिल्पाने विकला

Petrol-Diesel Price | एप्रिलनंतर पेट्रोलच्या किमती 39 वेळा आणि डिझेलचे रेट 36 वेळा वाढले; जाणून घ्या राज्यासह देशातील प्रमुख शहरांमधील आजचे दर

Lonavala News | लोणावळ्यात कोरोना नियमांचे उल्लंघन; दोन दुकानांना प्रत्येकी 10 हजार रुपये दंड