काय सांगता : होय, पाकिस्ताननं केला ‘अफलातून’ प्रयोग, चक्क गाईच्या ‘शेणा’वर धावणार बसेस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तान मागील वर्षांपासून एक आगळा वेगळा प्रयोग करत आहे. या प्रयोगानुसार पाकिस्तान चक्क गाईच्या शेणापासून गाड्या चालवणार आहे. या गाड्या कराचीमध्ये धावणार असून ग्रीन गॅसच्या माध्यमातून पाकिस्तान कार्बन डाय ऑक्साईडचं उत्सर्जन थांबविणार आहे.

कशी असणार ग्रीन गॅस योजना ?

मागील वर्षी पाकिस्तानने घोषणा केली होती की, गाईच्या शेणापासून बसेस धावणार आहेत. त्या नुसार पाकिस्ताननं प्रयत्न सुरु केले होते तर त्या प्रयत्नांना यश आल्याचे सांगून ही योजना पूर्णपणे तयार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आता लवकरच पाकिस्तानच्या कराची शहरात गाईच्या शेणापासून २०० बसेस धावणार आहेत. अशी माहिती पाकिस्ताननं दिली आहे.

जगातील एक आगळावेगळा प्रयोग

सध्या जगाला भेडसावणारी मोठी समस्या म्हणजे वायू प्रदूषण होय. जागतिक आरोग्य संस्थेच्या (WHO) ताज्या आकडेवारीनुसार जगभरात दरवर्षी जवळपास ४० लाख लोकांचा मृत्यू हा वायू प्रदूषणामुळं होत असतो. आणि विशेष म्हणजे या रँक मध्ये सर्वात वरच्या स्थानी पाकिस्तान आहे. हिवाळ्यात धूर आणि धुक्यामुळे मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण होत असल्यानं पाकिस्तानात ३ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर पर्यंत स्मॉग सीझन म्हणून घोषित करण्यात आले आहे. यामुळेच ही योजना पूर्णत्वास आली असून यातून वातावरणात ग्रीन गॅस जाऊन प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.

कशा धावणार या बसेस ?

पाकिस्तानने प्रदूषण कमी करण्यासाठी हा प्रयोग केला असून यातून नक्कीच पाकिस्तानला फायदा होईल यात काही प्रश्नच नाही. या प्रकल्पाला ग्रीन बस रॅपिड ट्रान्झीट नेटवर्क असं नाव देण्यात आलं आहे. यासाठी खास ३० किलोमीटरचा कॉरिडॉर देखील तयार करण्यात येणार आहे. शेणापासून मिथेन गॅसची निर्मिती करून त्यातून इंधन तयार केलं जाणार आहे आणि त्यातूनच या बसेस धावतील.

जल आणि वायू प्रदूषण होणार कमी

मागील वर्षी या प्रयोगाची घोषणा करण्यात आली असून २०२० मध्ये हा प्रकल्प तयार असल्याचे पाकिस्तानने सांगितले आहे. या प्रकल्पामुळे वातावरणातील हवा शुद्ध राहणार असून जलप्रदूषण देखील कमी होणार आहे. त्यामुळे जल आणि वायू प्रदूषण रोखण्यास पाकिस्तानला यश मिळणार आहे.

या ग्रीन बसेसमुळं पाकिस्तानच्या कराची शहरातील प्रदूषण कमी होणार असून ज्या भागातून ह्या बसेस धावणार आहेत त्या भागातील प्रदूषण शून्य टक्के होणार आहे. त्यामुळं पुढील काळात पाकिस्तानमधील वायू प्रदूषण आटोक्यात येईल.

पाकिस्तानने जवळजवळ ५८३ मिलियन डॉलर खर्च करून ग्रीन बसेसचा प्रयोग यशस्वी केलाय. यामधील ४९ मिलियन डॉलर हे द ग्रीन क्लायमेट फंड म्हणून देणार आहे. या आंतरराष्ट्रीय संघटनेकडून पाकिस्तानला मदत मिळाली असून लवकरच पाकिस्तानमधील प्रदूषण हे कमी होईल. द ग्रीन क्लायमेट हे संघटन जगातील सर्वच देशांना आर्थिक मदत पुरवत असते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/