हिंदू-ख्रिश्चन महिलांना ‘मजबूर दुल्हन’ बनवून चीनमध्ये विकतो पाकिस्तान

वॉशिंग्टन : अमेरिकेत धार्मिक स्वातंत्र्यासाठीचे प्रमुख डिप्लोमॅट सॅम्युअल ब्राऊनबॅक यांनी पाकिस्तान आणि चीनबाबत मोठा खुलासा केला आहे. त्यांनी म्हटले की, पाकिस्तान आपल्या देशातील हिंदू आणि ख्रिश्चन महिलांना ‘रखैल’ आणि ‘मजबूर दुल्हन’ म्हणून चीनला विकत आहे. ब्राऊनबॅक यांनी यास पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकासोबत धार्मिक भेदभावाचे खुले उदाहरण म्हटले आहे.

अमेरिकन डिप्लोमॅट सॅम्युअल ब्राऊनबॅक यांनी म्हटले, पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकांची स्थिती अतिशय खराब आहे आणि यामध्ये चीनसुद्धा भागीदार आहे. ते म्हणाले, पाकिस्तान आपल्या देशातील हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना चीनमध्ये दासी सांगून त्यांचे मार्केटिंग करतो. हे मार्केटिंग चीनी पुरुषांसाठी सक्तीची वधूचा एक स्त्रोत म्हणून काम करते.

अंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य अधिनियमांतर्गत पाकिस्तानला विशेष चिंताजनक देश (सीपीसी) म्हणून नामांकित केल्यानंतर ब्राऊनबॅक यांनी म्हटले की, चीनद्वारे दशकांपासून लागू करण्यात आलेल्या ‘एक मुल धोरण’ मुळे महिलांची संख्या खुप कमी आहे. या कारणामुळे चीनी पुरूषांसाठी वधू किंवा दासी (नोकर) च्या रूपात महिलांची आयात एक मोठी प्राथमिकता बनली आहे आणि पाकिस्तान याच अगतिकतेचा फायदा देशातील हिंदू आणि ख्रिश्चन महिलांना तिथे विकून उचलत आहे.

घृणास्पद स्तरावर भेदभाव
सॅम्युअल ब्राऊनबॅक यांच्यानुसार, पाकिस्तान आपल्या देशातील हिंदू आणि ख्रिश्चन महिलांना चीनी पुरूषांसोबत लग्नासाठी जबरदस्ती करतो. सोबतच त्यांना नोकर म्हणून सादरसुद्धा करतो. हे सर्व यासाठी सुद्धा होते, कारण या अल्पसंख्यांक महिलांकडे कोणतेही समर्थन नसते आणि आर्थिकस्थिती त्यांना असे करण्यास भाग पाडते. पाकमध्ये अल्पसंख्यांकांशी घृणास्पद स्तारावर भेदभाव केला जातो.

इस्लामाबादला विशेष चिंताजनक देश नामांकित केल्यानंतर ब्राऊनबॅक यांनी म्हटले की, पाकिस्तानमध्ये धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन सरकारद्वारे केले जाते, तर भारतात असे होत नाही. भारतात धार्मिक हिंसा जरूर होतात. यासाठी अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी देशाच्या धार्मिक स्वतंत्र्य आयोगाच्या (यूएससीआयआरएफ) त्या शिफारसी फेटाळल्या ज्यांच्यामध्ये भारताला विशेष चिंताजनक देश नामित करण्यास सांगण्यात आले होते. धार्मिक हिंसेच्या आधारावर भारताला सपीसी यादीत ठेवता येणार नाही आणि त्यास देखरेखीच्या यादीसुद्धा ठेवता येणार नाही.

पाक लष्कराद्वारे 1971 मध्ये मारण्यात आलेल्या लोकांना श्रद्धांजली द्यावी :
तिरुमूर्ती संयुक्त राष्ट्रात बुधवारी साजरा करण्यात आलेल्या अंतरराष्ट्रीय नरसंहार पीडित दिनी भारताने 1971 मध्ये मुक्ती संग्रामात पाक लष्कर आणि धार्मिक मलेशियाद्वारे मारण्यात आलेले तीस लाख लोक आणि दुष्कृत्याला बळी पडलेल्या लाखो महिलांना श्रद्धांजली देण्याचे आवाहन केले.

यूएनमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती यांनी यास मानवी इतिहासातील सर्वात भयंकर घटना म्हटले. त्यांनी म्हटले – या, आपण या पीडितांना श्रद्धांजली अपर्ण करूयात आणि अपेक्षा करूयात की, आता असे होणार नाही. संयुक्त राष्ट्र सचिव एंतोनियो गुटेरस यांनी म्हटले, नरसंहार सर्वात घृणास्पद गुन्ह्यांपैकी एक आहे.