‘या’ कामासाठी करता येणार नाही PAN कार्डचा ‘वापर’, जाणून घ्या ‘कुठं-कुठं’ आवश्यक
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुवाहाटी उच्च न्यायालयाने पॅन कार्ड आणि नागरिकत्व संबंधित आपला निर्णय सुनावला. ज्यात सांगण्यात आले की पॅन कार्ड कोणत्याही व्यक्तीचे नागरिकत्वाचे प्रमाण ठरवणारा दस्तावेज नाही. न्यायलयाने हा निर्णय एका महिलेची याचिका फेटाळताना दिली. पॅन कार्ड कुठे कुठे वापरात येते हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. देशातील प्रत्येक करदात्याकडे पॅन कार्ड असणे आवश्यक आहे, त्यामुळे पॅन कार्डचा वापर कुठे कुठे करणं आवश्यक आहे, याची माहिती करुन घेणे महत्वाचे आहे.
काय आहे पॅन कार्ड –
आयकर कायदा, 1961 नुसार आयकर विभागाद्वारे पॅन कार्ड जारी करण्यात येते. हे 10 आकडी क्रमांक असलेले कार्ड व्यक्ती, फर्म, व्यक्तींची संघटना, हिंदु अविभाजित कुटूंब, सहकारी समिती, सरकारी संस्था, स्थानीय प्राधिकरण, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप, ट्रस्ट आणि कारदाते सर्वांसाठीच आवश्यक आहे.
या कामसाठी पॅन कार्डची आवश्यकता –
– इनकम टॅक्स रिटर्न फाइल करण्यासाठी –
पॅनकार्डचा वापर इनकम टॅक्स रिटर्न करताना होतो. आयटीआर फाइल करण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक आहे.
– बँकेत खाते सुरु करण्यासाठी –
बँकेत खाते सुरु करण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक आहे. तसेच तुम्ही बँकेत किंवा इतर कोणत्याही संस्थेत डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डसाठी अप्लाय करणार असाल तर पॅन कार्ड तुमच्यासाठी आवश्यक आहे.
– वाहन खरेदी करताना किंवा विकताना –
जर तुम्ही 5 लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे वाहन खरेदी करत आहात किंवा जुने वाहन विकू इच्छित असाल तर तुमच्याकडे पॅन कार्डचे डिटेल असणे आवश्यक आहे.
– गुंतवणूक करताना –
डिपॉजिटवेळी कोणत्याही बॅंकेत अकाऊंट सुरु करताना ज्यात कोणत्याही आर्थिक वर्षा दरम्यान 50,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा करणे किंवा 5,00,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कमेसाठी पॅन कार्ड आवश्यक आहे.
– विम्याचे प्रीमियम जमा करण्यासाठी –
विमाधारकांना कोणत्याही आर्थिक वर्षात 50,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम प्रीमियमच्या स्वरुपात जीवन विम्याचे पैसे भरण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक आहे.
– मालमत्ता खरेदी, विक्रीसाठी –
5 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीची स्थावर मालमत्ता खरेदी करताना किंवा विकताना पॅन कार्ड आवश्यक आहे.