15 दिवसापासुन लासलगावी ‘पाणीबाणी’; 16 गावांची पाणी पुरवठा योजना पुर्ण पणे कोलमडली

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन  –  लासलगाव सह 16 गाव पाणी पुरवठा योजनेच्या सततच्या पाईपलाईन फुटणे, वीज पुरवठा खंडित होणे, पाणीपुरवठा मोटार नादुरुस्त होणे या मुळे नांदुरमध्यमेश्वर धरणात मुबलक पाणी साठा असुनही लासलगांव ला दहा ते पंधरा दिवसापासुन अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

गेल्या दोन वर्षांपासुन डोकेदुखी ठरु पाहणाऱ्या योजनेच्या कार्य क्षेत्रातील नागरीक पुर्ण पणे वैतागली आहे, या सततच्या पाईपलाईन लिकेज मुळे पाणीपुरवठा सतत खंडीत होत आहे. मान्सून पुर्व कामकाज म्हणुन गाजरवाडी जवळील नदीपात्रातील पाईपलाईन अनेक दिवसांपासून लिकेजेस होती त्या साठी सोळा गाव पाणी पुरवठा समितीने दुरुस्ती साठी पाणी पुरवठा बंद ठेवला होता, ते काम पुर्ण होते तोच तब्बल बारा तास विजपुरवठा खंडीत झालेला होता.त्यानंतर लगेच मोटारीचा शाफ्ट तुटला, या अशा विविध कारनाने तब्बल निम्मा महिना पाणीपुरवठा होऊ शकला नाही.

ही पाणी पुरवठा योजना पुर्ण पणे बेभरवश्याची झाली आहे त्या मुळे भविष्यात या योजना कितपत पाणी पुरवठा करु शकेल का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. या साठी वेळोवेळी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांना सोळागाव पाणी योजना संमितीचे शिष्टमंडळ, निवेदने, मंत्रालयातील बैठकी झाल्या आहे पण यावर रामबाण उपाययोजना च्या प्रतिक्षेत सोळा गाव पाणी पुरवठा योजनेतील जनता आहे.