Pankaja Munde | ‘सध्या मी बेरोजगार आहे, त्यामुळे…’, पंकजा मुंडेंच्या नव्या वक्तव्याने पुन्हा चर्चांना उधाण

पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल (PM Narendra Modi) केलेल्या वक्तव्यानंतर पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचं आणखी एक विधान आता चर्चेत आले आहे. मी कुणाला काम देऊ शकते? सध्या मी बेरोजगार आहे. त्यामुळे कुणाला काम देऊ शकत नाही, असं वक्तव्य पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केले आहे. परळी शहरात संत भगवानबाबा प्रतिष्ठान (Sant Bhagwan Baba Pratishthan) तर्फे आयोजित सार्वजनिक दुर्गा महोत्सवात त्या बोलत होत्या.

वादग्रस्त वक्तव्यावरुन झालेल्या ट्रोलिंगबाबत बोलताना त्या म्हणाल्या, मी तुझ्याबद्दल अफवा पसरवतो, तू माझ्याबद्दल अफवा पसरव. मी तुला ट्रोल करतो, तू मला ट्रोल कर. हे सोशल मीडियाचं युद्ध (Social Media War) आहे. जुन्या काळातलं युद्ध वेगळं होतं. नव्या काळातलं युद्ध वेगळं आहे. साहेबांच्या वेळचे नेते वेगळे होते, परिस्थिती वेगळी होती, कार्यकर्ते वेगळे होते. आत्ताचं युद्ध वेगळं आहे. हे युद्ध सोशल मीडियावर काढलं जातं, असं पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या.

या युद्धासाठी तलवारी, भाले, ढाली यांची गरज नाही. हे सोशल मीडियाचं युद्ध आहे.
आपण यामध्ये बसत नाही. आपण सगळे आपलं काम करत असतो, असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

काकांनी देवीच्या कानात काय सांगितलं, ताईंना सांगा मला काहीतरी काम द्या.
मला ते ऐकून खूप आनंद झाला. कारण मी जर कुणाला काम देऊ शकते, याचा अर्थ मलाही काम मिळेल.
सध्या मी बेरोजगारच (Unemployed) आहे. त्यामुळे मला तुमची प्रार्थना आवडली.
हे एक तीर में दो निशाण आहे, असा टोला पंकजा मुंडे यांनी लगावला.

Web Title :- Pankaja Munde | BJP leader pankaja munde currently i am unemployed so pankaja mundes statement

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ration Card | रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर ! मोदी सरकारने मोफत रेशनसंदर्भात घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Shivsena Chief Uddhav Thackeray | शिरुरमध्ये काही लोकं ‘ढळली’ पण खरी ‘अढळ’ लोकं माझ्यासोबत, उद्धव ठाकरेंचा आढळराव पाटलांना टोला