Parambir Singh | परमबीर सिंग यांच्या अडचणीत पुन्हा वाढ, आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

ठाणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग (former mumbai police commissioner parambir singh) यांनी काही महिन्यापूर्वी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर खंडणीचा आरोप केला. यावरून मागील काही महिन्यापासून राज्यात राजकीय वादळ ढवळून निघाले आहे. त्यावरून अनेक घडामोडी झाल्या असतानाच आता परमबीर सिंग (former mumbai police commissioner parambir singh) यांच्यासह काही अधिकाऱ्यांविरुद्ध खंडणी वसुलीची तक्रार एका क्रिकेट बुकीने (Cricket bookie) केली आहे. याबाबत तक्रार ठाणेनगर पोलीस ठाण्यात (Thane Nagar Police Station) करण्यात आलीय. सोनू जलान आणि केतन तन्ना यांनी ही तक्रार दाखल केलीय. यावरून आता परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.

नेमकं काय आहे तक्रारीत?

ठाणेनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत असं नमूद केलं आहे.
की, एका खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन परमबीर सिंग आणि त्यांच्या टीमने
करोडो रुपयांची खंडणी वसुली केल्याचे या तक्रारीत नमूद केलं आहे.
परमबीर सिंग (Parambir Singh) आणि त्यांच्या तत्कालीन खंडणी विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांविरोधात गुरुवारी (29 जुलै) जलान याने याबाबत लेखी तक्रार दाखल केलीय.

 

दरम्यान, त्यात म्हटलं आहे की, परमबीरसिंग यांच्या निर्देशावरून ठाणे खंडणी विरोधी पथकाचे माजी वरिष्ठ पीआय प्रदीप शर्मा,(Senior PI Pradeep Sharma), राजकुमार कोथमिरे (Rajkumar Kothamire) यांच्यासह काही अधिकाऱ्यांनी आपल्याला धमक्या देऊन साडे तीन कोटी रुपये उकळल्याचा गंभीर आरोप सोनू जालान (Sonu Jalan) यांनी केला आहे.

तसेच, आपले मित्र केतन तन्ना (Ketan Tanna) यांच्याकडूनही 1 कोटी 25 लाख रुपये वसुली केल्याचा दावा देखील केलाय.
परमबीर सिंगसह (Parambir Singh) अन्य अधिकाऱ्यांनी आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवून जेल मध्ये टाकल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.
काही खाजगी व्यक्ती व कुख्यात गुंड पोलिसांचे एजन्ट म्हणून ही सर्व वसुली करीत असल्याचं देखील त्या यकृत नमूद करण्यात आलं आहे.

 

Web Title : Parambir Singh | another extortion case against parambir singh cricket bookie complains, he is in trouble

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

General Transfers | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! अधिकारी, कर्मचार्‍यांच्या सर्वसाधारण बदल्यांना (GT) पुन्हा एकदा मुदतवाढ

PM Cares | कोरोनामध्ये अनाथ झालेल्या मुलांना 10 लाख रुपये… ‘पीएम केयर्स फॉर चिल्ड्रन’ची पूर्ण प्रोसेस काय आहे, कसा करावा लागेल अर्ज; जाणून घ्या

Nawab Malik | रश्मी शुक्ला यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्याकडून फोन टॅपिंगची परवानगी घेतली होती का?