Parbhani ACB Trap | सिंचन विहिरीची वर्क ऑर्डर मिळवुन देण्यासाठी लाचेची मागणी, परभणी पंचायत समितीमधील अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – सिंचन विहिरीचे वर्क ऑर्डर मिळवुन देण्यासाठी 7 हजार रुपये लाच स्वीकारणाऱ्या (Accepting Bribe) परभणी पंचायत समिती मधील सहायक कार्यक्रम अधिकाऱ्याला (कंत्राटी) परभणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Parbhani ACB Trap) सापळा रचून रंगेहाथ पकडले राहुल अंगदराव राख Rahul Angdarao Rakh (वय-35) असे लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. परभणी एसीबीने (Parbhani ACB Trap) ही कारवाई पंचायत समिती कार्यालय, परभणी (Panchayat Samiti Office, Parbhani) येथे केली.

याबाबत 29 वर्षाच्या व्यक्तीने परभणी एसीबीकडे (Parbhani ACB Trap) तक्रार केली आहे. तक्रारदार यांच्या भावाच्या नावावर मंजूर असलेल्या सिंचन विहिरीची वर्क ऑर्डर मिळवुन देण्यासाठी राहुल राख याने 7 हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी परभणी एसीबी कडे तक्रार केली. अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष पडताळणी केली असता राहुल राख याने 7 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. पथकाने पंचायत समिती परभणी येथे सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना राहुल राख याला रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक परिक्षेत्राचे (Nanded ACB) पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे
(SP Dr. Rajkumar Shinde) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक किरण बिडवे
(DySP Kiran Bidve), पोलीस निरीक्षक सदानंद वाघमारे (Police Inspector Sadanand Waghmare),
पोलीस निरीक्षक बसवेश्वर जकीकोरे (Police Inspector Basaveshwar Jakikore),
पोलीस अंमलदार चंद्रशेखर निलपत्रेवार, मिलिंद हनुमंते, अतुल कदम, शेख मुख्तार, शेख झिब्राईल, जनार्धन कदम यांच्या पथकाने केली.

Web Title :Parbhani ACB Trap | Demand for bribe to get work order of irrigation well, officials in Parbhani Panchayat Samiti in anti-corruption net

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Sada Sarvankar | शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांना ‘त्या’ प्रकरणात पोलिसांकडून ‘क्लिन चीट’

Urfi Javed | उर्फी जावेदने ‘या’ कारणामुळे खतरो के खिलाडी कार्यक्रमास दिला नकार