परभणी : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी युवकाची आत्महत्या

सेलू (परभणी) : पोलीसनामा ऑनलाईन

धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी परभणी जिल्ह्यातील सेलूजवळी गोमेवाकडीत एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे आज धनगर समाजाच्या आरक्षण आंदोलनाच्या बैठकीची तयारी सुरु होती. बैठकीची तयारी सुरु असतानाच तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज (रविवार) दुपारी एकच्या सुमारास गोमेवाकडी येथे घडली.
[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’57e6874a-9e2e-11e8-a246-79e74630a467′]

योगेश राधाकिशन कारके (वय-२० रा. गोमेवाकडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

धनगर समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करावा, या मागणीसाठी १३ ऑगस्टपासून धनगर समाजाच्या समाजबांधवांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यातच गोमेवाकडी येथील योगेश कारके या युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. गोमेवाकडी येथील कार्यकर्ते रविवारी (दि.१२) सेलू येथे आरक्षणाच्या बैठक घेण्याची तयारी करीत असतानाच योगेश याने आरक्षणाच्या मागणीसाठी गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. दरम्यान, पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले असून, पंचनामा सुरू केला आहे.
[amazon_link asins=’B0756RF9KY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5ca8a321-9e2e-11e8-86a1-0f02edafc208′]

दरम्यान, योगेश याने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मोबाईलवरून बी. शिंदे यांच्या मोबाईल क्रमांकावर टेक्स मॅसेज लिहिला होता. त्यात धनगर आरक्षणासाठी मी जीव देत आहे, असे म्हटले आहे. मात्र रेंजच्या कारणावरून हा मॅसेज सेंट झाला नसावा, अशी माहिती पोलिसांनी दिली.