Part Time Job | विना गुंतवणूक घरबसल्या कमाईची संधी देतंय ICICI डायरेक्ट; जाणून घ्या काय आहे हा पार्ट टाइम जॉब

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज आम्ही तुम्हाला अशा एका पार्ट टाइम जॉबबाबत (Part Time Job ) सांगणार आहोत ज्यास देशातील एक सर्वात मोठे ब्रोकरेज हाऊस आयसीआयसीआय डायरेक्ट ऑफर करत (Part Time Job ) आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही आयसीआयसीआय डायरेक्टचे डीमॅट उघडल्यानंतर प्रत्येक वेळी 750 रुपयांची कॅश मिळवू शकता. याच्या पुढील टप्प्यात तुम्ही आयसीआयसीआय डायरेक्टचे पार्टनर बनून फुल टाइम बिजनेस सुद्धा उघडू शकता.

काय आहे Refer & Earn ऑफर
आयसीआयसीआय डायरेक्टच्या या ऑफर अंतर्गत तुम्हाला ब्रोकरेज हाऊसला नवीन डीमॅट अकाऊंट उघडण्यास मदत करायची आहे. या ऑफर अंतर्गत जर कुणी तुम्ही पाठवलेल्या लिंकद्वारे आयसीआयसीआय डायरेक्टचे डीमॅट अकाऊंट उघडले तर तुम्हाला 250 रुपयांची कॅश मिळेल. यासोबत जर पुडील 30 दिवसात तुम्ही रेफर केलेल्या अकाऊंटवरून इक्विटी एफअँडओ किंवा कमोडिटी सेग्मेंट काही ट्रेड झाले तर तुम्हाला 500 रुपये अतिरिक्त मिळतील. म्हणजे तुम्ही प्रत्येक नवीन खात्यावर 750 रुपये कॅश मिळवू शकता.

कमाईची मर्यादा किती
रेफर अँड अर्नद्वारे कुणीही व्यक्ती एक महिन्यात 10 पेक्षा जास्त लोकांची अकाऊंट उघडण्याचा फायदा घेऊ शकत नाही. म्हणजे या ऑफरद्वारे कुणीही व्यक्ती कमाल 7500 रुपये प्रति महिना कमावू शकतो. मात्र, यापेक्षा जास्त कमावण्यास इच्छुक लोकांसाठी आयसीआयसीआय डायरेक्टने पार्टनरशिपची स्कीमसुद्धा ऑफर केली आहे.

काय आहे पार्टनरशिप ऑफर
रेफर अँड अर्न योजनेंतर्गत आयसीआयसीआय डायरेक्टची डीमॅट अकाऊंट उघडल्यास फी मिळते. मात्र पार्टनरशिप रेव्हेन्यू शेयरिंग बिझनेस मॉडल आहे. या स्कीम अंतर्गत तुम्ही आयसीआयसीआय डायरेक्टला त्यांचा बिझनेस वाढवण्यात मदत करू शकता, बदल्यात या कामाच्या आधारावर तुमची कमाई ठरेल.

Web Title :- Part Time Job | my profit icici dir refer and earn and partnership plan for indians

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Monsoon Healthy Diet | मान्सूनमध्ये तळलेल्या-भाजलेल्या पदार्थांनी होईल नुकसान,
आजारांपासून बचावासाठी ‘या’ 7 गोष्टींचे करा सेवन; जाणून घ्या

Prithviraj Chavan | माजी मुख्यमंत्री म्हणाले – ‘उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करा’; अनेकांच्या भुवया उंचावल्या (व्हिडीओ)

BJP MLA Atul Bhatkhalkar | ‘मुंबईत पावसामुळे लोक मेले तरी मुख्यमंत्री घर सोडायला तयार नाहीत’, भाजपचा हल्लाबोल