Pathaan | पठाण चित्रपटासाठी पुन्हा एकदा धक्का; सेन्सॉर बोर्डाने सुचवले ‘हे’ बदल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ (Pathaan) या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून चर्चेत होता. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यात अभिनेत्री दीपिका पादुकोणने भगव्या रंगाची बिकनी परिधान केल्यामुळे अनेक वाद निर्माण झाले होते. तर यावर भाजपा आणि हिंदू संघटनांनी आक्रमक होत यावर आक्षेप घेतला होता. तर आता पुन्हा एकदा पठाण (Pathaan) चित्रपटाला धक्का बसला आहे. कारण सेन्सॉर बोर्डने या चित्रपटात आणि गाण्यात काही बदल सुचवले आहेत.

 

नुकताच ‘पठाण’ (Pathaan) हा चित्रपट सेन्सॉर बोर्डकडे पाठवण्यात आला होता. तर या चित्रपटातील गाणी आणि चित्रपटात काही भाग बदलण्याची सूचना सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी केली आहे. या बदलानंतर हा चित्रपट पुन्हा एकदा सेन्सॉर बोर्ड समोर सादर करावा अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे की, “हा चित्रपट नुकताच सीबीएफसी समितीकडे प्रमाणपत्रासाठी दाखवण्यात आला. यावेळी सेन्सॉर बोर्ड ने या चित्रपटातील काही भाग आणि गाण्यातील काही भाग बदलण्याचे सुचवले आहे. यासाठी हे अमलात कसे आणावे याचे मार्गदर्शन ही केले जाणार आहे आणि हे बदललेली आवृत्ती पुन्हा एकदा सेन्सॉर कडे सादर करावी असे आदेशही देण्यात आले आहे”.

पुढे बोलताना प्रसून जोशी म्हणाले, “सेन्सॉर बोर्ड नेहमीच अभिव्यक्ती आणि
प्रेक्षकांची संवेदनशीलता यांचे संतुलन राखण्याचे विचार करत असते.
दिग्दर्शक आणि प्रेक्षक यांच्यात कोणताही वाद निर्माण होऊ नये याकडे लक्ष देत असते.
कोणाच्याही मनाला ठेच पोहोचता कामा नये अशा प्रवृत्तीच्या चित्रपटाला मान्यता देण्याचे काम आवर्जून केले जाते.
निर्मात्यांनी त्या दिशेनेच कार्य करत राहिले पाहिजे”.
पठाण हा चित्रपट येत्या 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

 

Web Title :- Pathaan | censor board examines shah rukh khan pathaan movie asks makers to make changes

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

MLA Siddharth Shirole | खडकीसह सहा कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या विकासासाठी दरवर्षी निधी द्यावा; आमदार शिरोळे यांची मागणी

Nana Patole | महाराष्ट्र सरकारनेही राज्यात जातनिहाय जनगणना करावी – नाना पटोले

Ambadas Danve | विदर्भाच्या विकासासाठी घोषणा नको तर कृती करा; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी मांडली भूमिका