Paush putrada ekadashi 2021 : पौष पुत्रदा एकादशी केव्हा आहे ? जाणून घ्या उपवासाचे नियम

पोलीसनामा ऑनलाइन टीम – उपवासात सर्वात महत्वपूर्ण उपवास एकादशीचा असतो. पौष महिन्यात शुक्ल पक्षातील एकादशीला पौष पुत्रदा एकादशी म्हणतात. या दिवशी भगवान विष्णुंची पूजा केली जाते. असे मानले जाते की, हा उपवास करणार्‍याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. संतती प्राप्तीसाठी हे व्रत करणे उत्तम मानले जाते. यावेळी पुत्रदा एकादशी 24 जानेवारीला आहे.

काय आहेत उपवास करण्याचे नियम ?
हा उपवास दोन प्रकारे केला जातो, निर्जल, फलाहारी किंवा जल उपवास. सामान्यपणे निर्जल उपवास पूर्णपणे निरोगी व्यक्तीनेच केला पाहिजे. उपवासाच्या एक दिवस अगोदर सात्विक भोजन करावे. प्रातःकाळी स्नान इत्यादीच्या नंतर उपवासाचा संकल्प घ्या. यानंतर गंगाजल, तुळशीपत्र, तिळ, फूले, पंचामृताने भगवान विष्णूंची पूजा करा. उपवासाच्या दुसर्‍या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला भोजन द्या आणि दान-दक्षिणा देऊन उपवास पूर्ण करा.

संतती प्राप्तीसाठी काय करावे ?
संतती प्राप्तीसाठी या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या बाल स्वरूपाची सुद्धा पूजा केली जाते. यासाठी प्रातःकाळी पती-पत्नीने संयुक्तपणे श्री कृष्णाची उपासना केली पाहिजे. त्यांना पिवळी फळे, पिवळी फुले, तुळशीपत्र आणि पंचामृत अर्पण करा. यानंतर संतती गोपाळ मंत्राचा जप करा. मंत्र जपानंतर पती-पत्नीने संयुक्तपणे प्रसाद ग्रहण करावा. एकादशीच्या दिवशी भगवान श्री कृष्णाला पंचामृत अर्पण करा.