Paytm चा धमाका ! मोबाइल रिचार्ज आणि बिल पेमेंट केल्याबद्दल मिळेल 1000 रुपयांपर्यंतचे बक्षीस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपण किराणा दुकानातून वस्तू खरेदी करण्यासाठी पेटीएम वॉलेटचा वापर करतो. तसेच पाणी आणि विजेची बिले भरण्यासाठी, गॅस सिलेंडर्स बुक करण्यासाठी, मोबाइल तसेच डीटीएचचे रिचार्ज करण्यासाठी किंवा ऑनलाइन ऑर्डर देऊन मागविण्यासाठी पेटीएमचा वापर करतो. पेटीएम सर्वाधिक होणार्‍या प्रसारामुळे देशभरातील सर्वात मोठा डिजिटल पेमेंट पर्याय म्हणून उदयास आला आहे. त्याचबरोबर पेटीएमने मोबाइल रिचार्ज आणि बिल देयकासाठी कॅशबॅक तसेच बक्षिसे जाहीर केली आहेत. कंपनीने त्याच्या प्लॅटफॉर्मवर 3 पे 300 कॅशबॅक ऑफर जाहीर केलेली आहे.

या ऑफरअंतर्गत नवीन वापरकर्त्यांना पहिल्या तीन रिचार्जवर 100 रुपयांपर्यंत निश्चित कॅशबॅक मिळेल, तर विद्यमान वापरकर्ते प्रत्येक रिचार्जवर 1000 रुपयांपर्यंतचे बक्षीस जिंकू शकतात. या ऑफर्स जिओ, व्होडाफोन आयडिया, एअरटेल, बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या प्रीपेड रिचार्जवर आणि पोस्ट पेड बिल पेमेंटवर लागू असतील.

रेफरल प्रोग्राममध्ये भाग घेऊन जिलका अतिरिक्त कॅशबॅक :
रिचार्ज आणि बिल देयकासाठी बक्षिसे मिळवण्याशिवाय कंपनीच्या रेफरल प्रोग्राममध्ये भाग घेऊन अतिरिक्त कॅशबॅक जिंकू शकता. कंपनीने असे म्हटले आहे की जेव्हा जेव्हा एखादा वापरकर्ता पेटीएमवर रिचार्ज करण्यासाठी मित्र आणि कुटुंबियांना आमंत्रित करतो, तेव्हा दोघेही 100 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळवू शकतात. हे दोघांनाही फायदेशीर आहे.

यूपीसाठी सारखं बनणार पेटीएम नेटवर्क, ओला आणि इंडसइंड बँक, एनयुईसाठी अर्ज करणार पेटीएम :
महत्त्वाचे म्हणजे पेटीएम, ओला फायनान्शियल आणि इंडसइंड बँक नएनयुईच्या परवान्यासाठी अर्ज करण्याची योजना आखत आहेत. यामुळे कंपन्यांना नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे संचालित युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस प्रमाणेच पेमेंट नेटवर्क तयार करण्यास सक्षम केले जाईल. दरम्यान, रिझर्व्ह बँकेने एनयुई अस्तित्वासाठी अर्ज करण्याची तारीख 31 मार्चपर्यंत वाढविली आहे.