पुरूषांच्या प्रायव्हेट पार्टवर प्रदूषणाचा होतोय परिणाम, अभ्यासात धक्कादायक खुलासा

पोलीसनामा ऑनलाईन टीम : एका अभ्यासात दावा केला आहे की , प्रदूषणामुळे मानवांचे लिंग आणि कमी होत आहेत. हा खुलासा झाल्यानंतर संपूर्ण जगात प्रदूषणाबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली असून लोक नव्याने प्रदूषणाबद्दल बोलत आहेत. या सर्वांच्या दरम्यान महिला सेलिब्रिटींनीही या गोष्टीवर मत व्यक्त केेल आहे. न्यूयॉर्कस्थित माउंट सिनाई हॉस्पिटलच्या अभ्यासानुसार प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाल्याने पुरुषांच्या लिंगाचा आकार कमी होत आहे. मुले विकृत गुप्तांगांसह जन्माला येतात.

माउंट सिनाई हॉस्पिटलमधील पर्यावरणविषयक औषध आणि सार्वजनिक आरोग्याचे प्राध्यापक डॉ. शन्ना हंस यांच्या म्हणण्यानुसार, पुरुषांच्या जननेंद्रियाचाच आकार कमी होत नाही, तर मानवी प्रजनन क्षमतेवरही परिणाम होत आहे. डॉ स्वान म्हणाले की, हे मानवांसाठी अस्तित्वाचे संकट आहे. ते म्हणाले की, अभ्यासामध्ये एक धोकादायक रसायन ओळखले गेले आहे जे मानवाची प्रजनन क्षमता कमी करत आहे. तसेच या कारणास्तव पुरुषाचे लिंग लहान होत आहे.

डॉ. स्वान यांनी पर्यावरण कार्यकर्ते ग्रेटा थानबर्ग यांनाही प्रदूषणाबद्दल ट्विट केले आहे. यात त्यांनी म्हटले की प्रदूषणाच्या बाबतीत मी ग्रेटाबरोबर आहे. त्याच वेळी, पर्यावरण कार्यकर्ते ग्रेटा थानबर्ग यांनी एका ट्विटमध्ये लिहिले आहे, ‘पुढील हवामान संपावर आपणा सर्वांना भेटू’. याशिवाय बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाने लिहिले की, आता बहुधा जग हवामान संकट आणि प्रदूषण गांभीर्याने घेईल.

डॉ. स्वान यांनी सांगितले की प्रदूषणामुळे गेल्या काही वर्षांत जन्मलेल्या मुलांच्या लिंगाचा आकार कमी होत आहेत. या विषयावर त्यांनी एक पुस्तक लिहिले आहे. ज्यात आधुनिक जगातील पुरुषांचे कमी होत असलेले शुक्राणू, स्त्रिया आणि पुरुषांच्या लिंगामध्ये होणारे विकासात्मक बदल आणि मानवजातीच्या समाप्तीविषयी बोलले आहे. डॉ. स्वान यांना जेव्हा उंदरांच्या संभोगाच्या लैंगिक संबंधात फरक जाणवला तेव्हा त्यांनी फिथलेट्स सिंड्रोमची तपासणी सुरू केली. त्यांच्या लक्षात आले की केवळ लिंगच नाही तर मादी उंदरांच्या गर्भावरही परिणाम होत आहे. त्यांचे पुनरुत्पादक अवयव लहान होत आहेत. मग त्यांनी ठरवले की, त्या मानवांवर अभ्यास करतील. अभ्यासादरम्यान, त्यांना समजले की ही समस्या मानवांच्या मुलांमध्येही आहे. त्यांचे गुप्तांग लहान आणि विकृत होत आहेत. अ‍ॅनोजेनाइटल अंतर कमी होत आहे. हे लिंगाच्या आकारा संबंधित एक समस्या आहे. प्लॅस्टिक बनवण्यासाठी फिथॅलेट्स रसायनांचा वापर केला जातो. हे केमिकल खेळण्यांद्वारे आणि नंतर अन्नाद्वारे मानवी शरीरात पोहोचत आहे.

डॉ. स्वान म्हणतात की, जर प्रजनन दर अशाच प्रकारे कमी होत राहिला तर जगात जास्त पुरुष 2045 पर्यंत शुक्राणूंची संख्या वाढवण्याची क्षमता गमावतील. यापूर्वी सन 2017 मध्ये एका अभ्यासात दावा करण्यात आला होता की पाश्चात्य देशांतील पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या 50 टक्क्यांनी घटली आहे. गेल्या चार दशकांत असे 185 अभ्यास झाले आहेत. ज्यात 45,000 निरोगी पुरुषांचा समावेश होता. दर दशकानंतर त्यांची शुक्राणूंची संख्या कमी होते.