‘या’ अभिनेत्रीकडून कपडे घालायला शिक : ‘ट्रोलर्स’चा शाहरुखच्या सुहानाला ‘सल्ला’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानची मुलगी सुहाना खान स्टार किड्समध्ये अशी आहे जी की, नेहमीच सोशल मिडियावर चर्चेत असते. सध्या सुहाना तिच्या फोटोंसाठी खूप चर्चेत आहे. पुन्हा एकदा तिने आपले काही फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहे. वेगवेगळ्या अंदाजातील तिचे काही फोटो व्हायरल होत आहे. या फोटोला चाहत्यांनी खूप लाइक केले आहे.

खरतर सुहानाचा फोटो व्हायरल होण्यामागे तिची सुंदरता नसून एक वेगळेच कारण आहे. सुहानाने आरशासमोर सेल्फी फोटो काढला आहे. फोटोत सुहानाच्या हाताता तिचा मोबाईल दिसत आहे. तिच्या मोबाईलच्या बॅककव्हरमध्ये एटिएम कार्ड दिसत आहे.

https://www.instagram.com/p/ByQG_76A0lL/?utm_source=ig_embed

एका युजरने कमेंटमध्ये लिहले की, ‘सुहानाच्या मोबाईलच्या बॅककव्हरच्या मागे जे एटिएम कार्ड आहे त्यामध्ये करोडो रुपये असतील.’ आणखी एका युजरने लिहले की, ‘सुहानाला एटिएम कार्ड तिच्या खर्चासाठी मिळाले असेल. किती नशीबवान आहे ती.’

याव्यतिरिक्त सुहानाची तुलना सारा अली खानशी केली आहे. युजरने लिहले की, ‘कपडे घालण्याची पद्धत साराकडून शिक.’

काही दिवसांपुर्वी सुहाना तिच्या फ्रेंडच्या लग्नाला गेली होती. तेथिल फोटो देखील सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. या फोटोमध्ये सुहाना हाताला मेहेंदी काढताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/ByFrgDTADmt/?utm_source=ig_embed

काही दिवसांपुर्वी सुहानाच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये सुहाना आपल्या ग्रुपसोबत डान्स करताना दिसून आली.

https://www.instagram.com/p/BunFbAeh4eT/?utm_source=ig_embed

असे समजले आहे की, सुहाना लंडनमध्ये आपले शिक्षण पुर्ण करत आहे. यासोबतच ती अभिनयाचे शिक्षण देखील घेत आहे. हे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर सुहाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.