काय सांगता ! होय, बंगळुरूमध्ये ‘विभक्त’ झालेल्या ‘पाळीव’ कुत्र्याला परत आणण्यासाठी मुंबईच्या व्यावसायिकानं बुक केलं ‘चार्टर्ड प्लेन’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना विषाणूला रोखण्यासाठी अनेक पावले उचलली जात आहेत. दरम्यान स्थलांतरित आपल्या घरी परतण्यासाठी धडपडत आहेत, परंतु त्यांना घरी परतण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. मात्र या दरम्यान मुंबईतील एका व्यावसायिकाने आपल्या पाळीव कुत्र्यास परत आणण्यासाठी बेंगळुरूसाठी एक चार्टर्ड फ्लाइट बुक केली आहे. घटनेशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, कुत्रा आणण्यासाठी तीन सदस्यांनी 4 जून रोजी मुंबईहून बेंगळुरूला उड्डाण केले. वास्तविक हा कुत्रा एका भेटीदरम्यान कुटूंबापासून विभक्त झाला होता.

केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सूत्रांनी सांगितले की, हे कुटुंब दुपारी दीड वाजता विमानतळावर उतरले आणि कुत्र्यासह मुंबई परत जाण्यापूर्वी सुमारे 2 तास बेंगळुरू शहरात घालवले. कुटूंबाने कोविड -19 चा निगेटिव्ह चाचणी रिझल्ट आपल्यासोबत आणला होता कारण कर्नाटक सरकारकडून राज्यात केल्या जाणाऱ्या छोट्या प्रवासासाठी त्यास अनिवार्य करण्यात आले आहे.

ज्या लॅबमधून परिवाराने कोरोना चाचणी आणली, ती आयसीएमआरच्या यादीमध्ये नाही

खासगी लॅबने जारी केलेला कोविड -19 चा चाचणी अहवाल या कुटुंबीयांनी विमानतळाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. तथापि, कोविड -19 चाचणी ज्या प्रयोगशाळेत घेण्यात आली ती चाचणी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) मंजूर केलेल्या प्रयोगशाळांच्या यादीमध्ये नव्हती. यामुळे विमानतळावर काही काळ गोंधळ उडाला कारण संबंधित अधिकाऱ्यांना प्रयोगशाळेतील निकाल योग्य आहेत की नाही याची खात्री नव्हती. पण एकदा ते मान्य झाल्यानंतर कुटुंबास पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली.

‘त्यांच्या प्रवासाचा हेतू आमची अडचण नाही’

दरम्यान सरकारी सूत्रांनी सांगितले की, ‘त्यांच्या प्रवासाचा हेतू आमची अडचण नाही.’ यानंतर कुटुंबीयांना कुत्र्याचे पिल्लू घेण्यासाठी शहरात सोडण्यात आले आणि त्यानंतर ते आपल्या कुत्र्यासमवेत विमानतळावर परतले आणि घरी जाण्यासाठी उड्डाण केले. इतर सरकारी सूत्रांनी सांगितले की सर्व आवश्यक कागदपत्रे योग्य होती आणि त्यासाठी योग्य नियमांचे पालन केले गेले. ‘आम्ही त्यांना कोणतीही विशेष व्हीआयपी ट्रीटमेंट न देता प्रत्येक सामान्य प्रवाशाप्रमाणे त्यांच्याशी व्यवहार केला. त्यांच्या प्रवासाचा हेतू आमची अडचण नाही.’