Peter England | व्हॅक्सीन घेतली असेल तर पीटर इंग्लंड देईल 1000 रुपयांच्या फ्री शॉपिंगची संधी ! जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना व्हॅक्सीनबाबत (corona vaccine) एकीकडे सरकार लोकांना जागरूक करत असताना आता कंपन्या सुद्धा यामध्ये सहभागी झाल्या आहेत. या अंतर्गत मेन्सवेयर ब्रँड पीटर इंग्लंडने (Peter England) मंगळवारी म्हटले की, ते अशा ग्राहकांसाठी 1,000 रुपयांची मोफत खरेदीची (Free shopping) ऑफर देत आहेत ज्यांनी कोविड -19 व्हॅक्सीन घेतली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

या स्कीम अंतर्गत ग्राहकाने जर पीटर इंग्लंडमधून (Peter England) 1,999 रुपयांची खरेदी केली आणि जर त्याने व्हॅक्सीन घेतलेली असेल तर ते या विशेष ऑफरचा लाभ घेऊ शकतात.
यासाठी त्यांना केवळ आपल्या आधारकार्डसह लसीकरणाचा पुरावा दाखवावा लागेल.

तसेच पीटर इंग्लंड, आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेडचा भाग, मॅकडोनल्ड्स आणि गोदरेज अप्लायन्सेस सारख्या ब्रँड व्हॅक्सीन घेतलेल्या ग्राहकांना काहीतरी प्रोत्साहन देत आहेत.
व्हॅक्सीनेशनबाबत (Vaccination) काही लोकांना अजूनही शंका आहे.
ज्यामुळे सरकार वेगवेगळ्या स्तरावर लोकांचा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न करत आहे.
आता कंपन्यांनी सुद्धा यामध्ये सहभागी होण्यास सुरूवात केली आहे.

सोशल मीडियावर #TimetoVaccinate

जागतिक स्तरावर सुद्धा अनेक मोठ्या कंपन्या जसे की एबी इन्बेव्ह, ओकेक्यूपिड, टिंडर इत्यादींनी लसीकरणासंदर्भातील अभियानांची घोषणा करण्यात आली आहे.
पीटर इंग्लंडने म्हटले की, या कंपन्या खरेदीच्या वेळी सवलतीसह एकरकमी सूट सुद्धा देत आहेत.
ज्या ग्राहकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे, ते सुद्धा 30 जून 2021 पर्यंत याचा लाभ घेऊ शकतात.

हे अभियान पुढे नेण्यासाठी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर #TimetoVaccinate हॅशटॅग सुरू केला आहे.
पीटर इंग्लंडचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर मनीष सिंघई (Manish Singhai) यांनी म्हटले, आम्हाला वाटते की, एक समाज म्हणून आपण जागतिक स्तरावर एक भयंकर महामारीचा सामना करत आहोत आणि देशभरात लसीकरण आंदोलनाला प्रोत्साहन देणे आमची जबाबदारी आहे.
पीटर इंग्लंड या उपक्रमाद्वारे आपले लक्ष्य सुनिश्चित करत आहे.

Web Title : peter england will give a chance of free shopping of worth one thousand if the vaccination is done

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

WhatsApp ची ही आहेत टॉप सीक्रेट फिचर्स, जी बदलून टाकतील तुमच्या चॅटिंगचा अनुभव; जाणून घ्या