पेट्रोल आणि डिझेलचा वापरात मोठ्या प्रमाणात घट, गेल्या 20 वर्षांत सर्वात कमी मागणी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे (Lockdown) 2020 मध्ये देशात पेट्रोल आणि डिझेलच्या (petrol and diesel ) मागणीत मोठी घट झाली. याचे मुख्य कारण देशातील औद्योगिक उत्पादन व कर कारखाना बंद असल्याचे सांगितले जाते. 2020 च्या सुरूवातीस कोरोना साथीच्या आजारामुळे संपूर्ण देशात लॉकडाउन लादण्यात आला. त्यामुळे कारखाना आणि व्यवसाय देशभर बंद करावा लागला. ज्याचा थेट परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या (petrol and diesel ) मागणीवर पडला आणि ही मागणी गेल्या 20 वर्षातील सर्वात खालच्या पातळीवर गेली. पण एकदा लॉकडाऊन उघडल्यानंतर पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या (petrol and diesel )मागणीत वाढ झाली आहे.

पेट्रोल आणि डिझेलची मागणी 70 टक्क्यांनी घटली –
जगातील सर्वाधिक तेल वापरणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. भारतात तेलाचा वापर कमी होणे हे देशातील मंदीचे लक्षण आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाच्या अहवालानुसार 2019 च्या तुलनेत यंदा तेलाच्या मागणीत 10.8 टक्के घट झाली आहे. 193.4 मिलियन टनांसह ते पाच वर्षांच्या नीचांकावर आहे. मार्च 2020 मध्ये लोकडाऊनमुळे तेलाची मागणी 70 टक्क्यांनी कमी झाली आहे. कारखाने बंद पडणे आणि उत्पादनातील टंचाई यामुळे मागणीत ही घसरण झाली आहे.

गेल्या महिन्यात पेट्रोलच्या वापरामध्ये वाढ –
लॉकडाऊनमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. ज्यामुळे देशाच्या जीडीपीमध्ये मोठी घट झाली आहे. आशिया खंडातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था मंदीपासून मुक्त होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने बरेच निर्णय घेतले आणि अनेक निर्बंध शिथिल केले. सरकारने निर्बंध शिथिल केल्यापासून, मागणीत किंचित सुधारणा होऊ लागली आहे. गेल्या महिन्यात पेट्रोलच्या वापरामध्ये 9.3 वाढ झाली आहे. मे 2019 नंतरची ही सर्वोच्च पातळी आहे.

मागणीत घट असूनही किंमतींमध्ये कोणतीही कपात नाही –
गेल्या वर्षात देशात पेट्रोल आणि डिझेलच्या (petrol and diesel ) मागणीत 70 टक्क्यांनी घट झाली. परंतु किमतीत कोणतीही घट झाली नाही. पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात झालेली वाढ हे यामागील कारण आहे. प्रत्यक्षात लॉकडाऊनमुळे देशातील व्यवसाय पूर्णपणे बंद होता. अशा परिस्थितीत केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी उत्पन्न वाढविण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवरील (petrol and diesel ) उत्पादन शुल्कात वाढ केली. ज्यामुळे मागणी कमी असूनही पेट्रोल आणि डिझेलची (petrol and diesel ) किंमत कमी झाली नाही.