Petrol-Diesel Price Hike | ‘या’ राज्यामध्ये 3 रुपये प्रति लीटरने महागले पेट्रोल-डिझेल, सरकारची मोठी घोषणा

नवी दिल्ली : Petrol-Diesel Price Hike | राज्‍य सरकारने पेट्रोल-डिझलच्या दरात वाढीची घोषणा केली आहे. सरकारने पेट्रोल ३ रुपये प्रति लीटरने वाढवले आहे, तर डिझलच्या दरात ३.०२ रुपयांची वाढ केली आहे. ही वाढ सेल टॅक्समध्ये बदलानंतर झाली आहे. पेट्रोलियम डिलर्स असोसिएशन नुसार, पेट्रोल आणि डिझेलचे दर कर्नाटकमध्ये वाढवले गेले आहेत.

पेट्रोल-डिझलेच्या किमतीत अनुक्रमे ३ रूपये आणि ३.०२ रूपयांची वाढ होईल, कारण राज्य सरकारने सेल टॅक्‍समध्ये बदल केला आहे. तर देशातील इतर राज्यात पेट्रोल आणि डिझलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. नवी दिल्लीत आज पेट्रोलचा दर ९४.७२ रुपये प्रति लीटर आहे.( Petrol-Diesel Price Hike)

पेट्रोल-डिझेलवर किती वाढला टॅक्स?

शनिवारी राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार, पेट्रोलवर कर्नाटक विक्री कर २५.९२ टक्केवरून वाढवून २९.८४ टक्के आणि डिझेलवर १४.३ टक्केवरून वाढवून १८.४ टक्के केला आहे. कर्नाटक पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन नुसार, पेट्रोलचा दर ३ रुपयांनी वाढून १०२.८५ रुपये प्रति लीटर होईल, तर डिझेलचा दर ३.०२ रुपयांनी वाढून ८८.९३ रुपये प्रति लीटर होईल. हा आदेश तात्काळ लागू केला जाईल.

देशातील इतर शहरांतील पेट्रोल-डिझेलचे प्रति लीटर अनुक्रमे दर

  • मुंबई – १०४.२१ रुपये, ९२.१५ रुपये
  • कोलकाता – १०३.९४ रुपये, ९०.७६ रुपये
  • चेन्नई – १००.७५ रुपये, ९२.३४ रुपये

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dattatray Bharne | आमदार दत्तात्रय भरणे यांना सायबर चोरट्यांनी बनवलं ‘मामा’, अपघाताची बतावणी करुन घातला गंडा

Sinhagad Road Pune Crime News | पुणे : वाहन चोरी करणाऱ्या दाम्पत्याला सिंहगड पोलिसांकडून अटक, 8 चारचाकी व 9 दुचाकी जप्त (Video)