Petrol Diesel Price Today | सर्वसामान्यांना महागाईचा फटका ! लागोपाठ दुसर्‍या दिवशी वाढले डिझेलचे दर, जाणून घ्या नवीन दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Petrol Diesel Price Today | अगोदर महागाईने हैराण झालेल्या नागरिकांना आता आणखी मोठा फटका बसणार आहे. डिझेलच्या किंमती वाढत असल्याने आगामी काळात महागाईचा आगडोंब आणखी उसळू शकतो. सरकारी तेल कंपन्यांनी लागोपाठ दुसर्‍या दिवशी डिझेलच्या किमतीत वाढ (Petrol Diesel Price Today) केली आहे. डिझेलच्या दरात आज 25 पैसे प्रति लीटरची वाढ करण्यात आली. मात्र, पेट्रेालचे दर स्थिर ठेवण्यात आले.

काल रविवार 26 सप्टेंबरला सुद्धा डिझेलच्या किमतीत 25 पैसे आणि 24 सप्टेंबरला 20 पैसे प्रति लीटरची वाढ करण्यात आली होती. देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती सध्या विक्रमी स्तरावर कायम आहेत. तर दुसरीकडे सामान्य माणूस महागाईने बेजार झाला आहे.

मुंबईत डिझेलचा दर 96.94

या वाढीनंतर मुंबईत पेट्रोल 107.26 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 96.94 पैसे प्रति लीटर आहे.
दिल्लीत एक लीटर पेट्रोलची किंमत 101.19 रुपये आणि डिझेलचा भाव 89.32 रुपये प्रति लीटरवर पोहचला आहे.
कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 101.62 रुपये तर डिझेलचा दर 92.42 रुपये लीटर आहे.
तर चेन्नईत सुद्धा पेट्रोल 98.96 रुपये लीटर आहे तर डिझेल 93.93 रुपये लीटरने विकले जात आहे.

इंधन दरवाढीमुळे महागाईचा भडका

पेट्रोल-डिझेलच्या किंमती विक्रमी स्तरावर पोहचल्याने देशभरात महागाईचा भडका उडाला आहे.
गरजेच्या वस्तू सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत.
कारण सर्व वस्तूंचे वाहतूक भाडे वाढले आहे. 19 राज्यात पेट्रोल 100 रुपयांच्या पुढे गेले आहे.

 

यामुळे महागले पेट्रोल आणि डिझेल

पेट्रोल-डिझेलच्या दरात एक्साईज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर टॅक्सचा समावेश केल्यानंतर दर जवळपास दुप्पट होतो.
परदेशी चलनदरासह अंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या किमती काय आहेत यावर रोज पेट्रोल-डिझेलच्या किमती (Petrol Diesel Price Today) ठरतात.

 

Web Title : Petrol Diesel Price Today | petrol diesel prices hike update 27th september increase price today know latest rates

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | मुलाला कोयत्यासह पकडल्यानंतर बापाने चिंचवड पोलीस ठाण्यातच केली पोलिसांना मारहाण

Android Version | आजपासून जुन्या फोनवर चालणार नाही Gmail, यूट्यूबसह गुगलचे कोणतेही अ‍ॅप! जाणून घ्या कारण

Stock Market | शेयर बाजारातून कमावण्याची संधी ! 70 आयपीओ रांगेत, 28 कंपन्यांनी जमवले 42000 कोटी