पेट्रोलच्या दरात पुन्हा वाढ ! डिझेल 83 पार

पुणे : पेट्रोलच्या किंमती आज पुन्हा एकदा वाढ झाली असून पेट्रोलची आगेकुच आता ९४ रुपयांपर्यंत गेली आहे.

आज पेट्रोलच्या दरात पुन्हा २९ पैशांनी वाढ होऊन पेट्रोल आता ९३.७७ रुपये लिटर इतकी झाली आहे. त्याचवेळी डिझेलमध्ये लिटरमागे २६ पैशांची वाढ होऊन आज पुण्यात डिझेलची किंमत ८३ रुपये लिटर इतकी झाली आहे. ऑल इंडिया पेट्रोल डिलर्स असोशिएशनचे प्रवक्ते अली दारुवाला यांनी ही माहिती दिली.