सलग चौथ्या दिवशीही पेट्रोलच्या दरात वाढ !

पुणे : पाच राज्यातील निवडणुकांमुळे जवळपास ६६ दिवस रोखून धरलेली इंधनावरील भाववाढीने आता वेग घेतला आहे. आज सलग चौथ्या दिवशी पेट्रोल -डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

आज गुरुवारी पेट्रोलच्या दरात प्रति लिटर २७ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलचा दर आता ९७.०४ वरुन ९७.३१ रुपये लिटर झाला आहे. त्याचवेळी डिझेलच्या दरात प्रति लिटर ३२ पैशांनी वाढ झाली आहे. डिझेलचा दर आज ८६.८५ वरुन ८७.१७ रुपये लिटर झाला आहे.

पॉवर पेट्रोलच्या दरात प्रति लिटर २७ पैशांनी वाढ झाली असून तो आता १००.९९ रुपये लिटर झाला आहे. पेट्रोल डिझेलमधील ही दरवाढ आणखी काही दिवस होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही भाववाढ अशीच चालू राहिल्यास पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाल्याने मालवाहतूकीच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे़