पेट्रोल, डिझेलच्या दरात सलग 10 व्या दिवशी वाढ

पुणे : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात गेली ९ दिवस सुरु असलेली भाववाढ आज १० दिवशीही कायम राहिली आहे. आज पेट्रोलच्या दरात ३० पैशांनी वाढ झाली असून पुण्यात पेट्रोलचा दर ९६.२५ रुपये प्रति लिटर इतका झाला आहे. त्याचबरोबर डिझेलच्या दरात ३५ पैशांनी वाढ होऊन डिझेलचा दर लिटरमागे ८५.९८ रुपये झाला आहे. पॉवर पेट्रोलमध्येही ३० पैशांची वाढ होऊन पॉवर पेट्रोलचा पुण्यातील प्रति लिटरचा दर ९९.९३ रुपये इतका झाला आहे.

इंधनाच्या दरातील ही भाववाढ किती दिवस कायम राहणार याविषयी लोकांमध्ये चिंता वाढू लागली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील भाववाढीमुळे सर्व सामान्यांचे मासिक आर्थिक गणित बिघडले आहे.

त्याचबरोबर डिझेलच्या दरात होत असलेल्या भाववाढीमुळे देशभरातील सार्वजनिक वाहतूक संस्थांही अडचणीत येऊ लागल्या आहेत. आधीच तोट्यात असलेल्या या संस्थांचा तोटा अजूनच वाढू लागला आहे.