प्रजासत्ताक दिनालाही पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ !

पुणे : पेट्रोल (Petrol) डिझेलच्या किंमतीतील वाढ कमी होण्याचे नाव घेत नाही. दिवसेंदिवस पेट्रोल (Petrol) डिझेलच्या किंमती वाढतच आहे. आज मंगळवारीही पेट्रोलच्या किंमतीत ३३ पैशांची वाढ झाली. पुण्यात आज २६ जानेवारीसाठी पेट्रोलचा दर ९२.२८ इतका असणार आहे. २४ जानेवारी रोजी तो ९१.९५ इतका होता. त्यात २५ जानेवारी रोजी वाढ झाली नव्हती. आज पुन्हा पेट्रोलच्या (Petrol) दरात वाढ झाली आहे.

डिझेलच्या दरात आज ३७ पैशांची वाढ झाली आहे. पुण्यात आज डिझेल ८१.४६ रुपये लिटर असणार आहे. २४ जानेवारीला डिझेलचा दर ८१.०९ रुपये होता. सीएनजीच्या दरात वाढ झालेली नाही. ऑल इंडिया पेट्रोल डिलर्स असोशिएशनचे प्रवक्ते अली दारुवाला यांनी हे दर कळविले आहेत.