Good News : कोरोनाशी लढण्यासाठी आणखी एक शस्त्र, भारताला जुलैपासून मिळू शकते फायजरची लस

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना व्हायरस संकट आणि व्हॅक्सीनच्या टंचाईच्या दरम्यान एक दिलासा देणारी बातमी आहे की, फायजरची लस (Pfizer vaccine) सुद्धा जुलैपासून भारताला मिळू शकते. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटले की, फायजरशी चर्चा सुरू आहे आणि त्यांनी संकेत दिले आहेत की, ते भारतासाठी लस उपलब्ध करून देतील. यामुळे त्या वृत्ताला बळ मिळाले आहे, ज्यामध्ये म्हटले होते की, फायजरने जुलैपासून ऑक्टोबरच्या दरम्यान पाच कोटी डोस भारताला देण्यात येतील.

फेसबुकने बदलले धोरण : ’लॅबमध्ये तयार झाला कोरोना’ असा दावा करणारी पोस्ट करणार नाही डिलिट

व्ही. के. पॉल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत म्हटले की, फायजरसोबतच चर्चा सुरू आहे. त्यांनी म्हटले की, फायजरने लसीच्या संभाव्य दुष्परिणामांबाबत मागणी केली केली आहे, ज्यावर भारत सरकार विचार करत आहे आणि लवकरच यावर निर्णय घेतला जाईल. त्यांनी म्हटले की, अशा प्रकारची सूट फायजरने अमेरिकेसह त्या सर्व देशांमध्ये केली होती, जिथे लस पुरवली आहे.

पॉल यांनी म्हटले की, या मुद्द्यांवर मार्ग निघाल्यानंतर फायजरकडून जुलैपासून लसीचा पुरवठा होण्याची शक्यता आहे. जर फायजरची लस भारताला मिळाली तर कोरोना लसीकरण कार्यक्रमात सहभागी होणारी ही चौथी लस असेल. आता कोव्हॅक्सीन, कोविशील्ड तसचे स्पूतनिक लसीचा वापर केला जात आहे. देशात लसीची उपलब्धता कमी असल्याने रोज 15-20 लाख डोसच दिले जात आहेत. यापूर्वी हा आकडा 30 लाखाच्या वर होता.

काही दिवसांपूर्वी अमेरिकन कंपनी फायजरने म्हटले होते की, ते 2021 मध्येच पाच कोटी डोस तयार करण्यासाठी तयार असतील, पण त्यांना नुसानीसह काही नियम आणि अटींमध्ये मोठी सूट हवी आहे. या अमेरिकन कंपनीने पाच कोटी डोस याच वर्षी उपलब्ध करण्याचा संकेत दिला आहे. यामध्ये एक कोटी डोस जुलैमध्ये, एक कोटी ऑगस्टमध्ये आणि दोन कोटी सप्टेंबरमध्ये उपलब्ध केले जातील. कंपनी केवळ भारत सरकारशी चर्चा करेल आणि लसीचे पैसे भारत सरकारद्वारे फायजर इंडियाला द्यावे लागतील.

Hair Care Tips : रूटीनमध्ये ‘हे’ 8 बदल करा, आपोआप लांब होतील केस; जाणून घ्या

‘ही’ 8 लक्षणं सांगतात व्हिटॅमिन C ची कमतरता, डोळ्यांची दृष्टी जाण्याचा धोका; ‘हा’ आहे उपाय

दातांना किड लागली असल्यास ‘हे’ घरगुती उपाय करा, अगदी सहजपणे समस्या होईल दूर; जाणून घ्या

White Fungal Infection : भारतात ’व्हाईट फंगस’ संसर्ग देत आहे नवीन आरोग्य चिंतांना जन्म