PFRDA | NPS नियमांमध्ये बदल ! सहभागी होणार्याचे वय वाढवले, बाहेर पडण्याचा नियम सुद्धा झाला सोपा, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PFRDA | पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) ने नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) मध्ये 65 वर्षाच्या वयानंतर सहभागी होणार्या अंशधारकांसाठी यास आणखी आकर्षक बनवले आहे. या अंतर्गत अशा लोकांना आपला 50 टक्केपर्यंतचा फंड इक्विटी किंवा शेयरसाठी विभागण्यास परवानगी दिली आहे. सोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी बाहेर पडण्याचे नियम सोपे केले आहेत.
एनपीएसमध्ये सहभागी होण्याचे वय 65 वरून वाढवून 70 वर्ष केल्यानंतर पीएफआरडीएने प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या नियमात सुधारणा केली आहे. एनपीएसमध्ये प्रवेशाचे वय 18-65 वरून दुरूस्त करून 18-70 केले आहे.
सुधारित मार्गदर्शक तत्त्वांवर पीएफआरडीएच्या सर्क्युलरनुसार, 65-70 वयोगटातील कुणीही भारतीय नागरिक किंवा परदेशात वास्तव्यास असलेला भारतीय नागरिक (OCI) एनपीएसमध्ये सहभागी होऊ शकतो. तो या योजनेत 75 वर्षाच्या वयापर्यंत सहभागी होऊ शकतो.
ऑटो चॉईस अंतर्गत कमाल 15 टक्केपर्यंत गुंतवणूक
सर्क्युलरमध्ये म्हटले आहे की, ज्या अंशधारकांनी आपले एनपीएस खाते बंद केले आहे, ते सुद्धा वयाच्या वाढीच्या नियमानुसार, नवीन खाते उघडू शकतात. पीएफआरडीएने म्हटले आहे की, जर कुणी अंशधारक 65 वर्षाच्या वयानंतर एनपीएसमध्ये सहभागी होत असेल आणि डिफॉल्ट ऑटो चॉईस अंतर्गत गुंतवणुकीचा निर्णय घेत असेल तर त्यास शेयरमध्ये केवळ 15 टक्केपर्यंतच्या गुंतवणीची परवानगी असेल.
एकरकमी 60 टक्के पैसे काढू शकता
एनपीएसमधून 65 वर्षाच्या वयानंतर सहभागी होणार्या अंशधारकांसाठी सर्क्युलरमध्ये म्हटले आहे की,
त्यांना सामान्यपणे तीन वर्षानंतर बाहेर पडण्यास परवानगी असेल.
पीएफआरडीएने म्हटले की, अंशधारकाला एन्यूइटीच्या खरेदीसाठी किमान 40 टक्के फंडाचा वापर करावा लागेल.
उर्वरित रक्कम एकरकमी काढता येऊ शकते.
संपूर्ण काढता येऊ शकतो 5 लाखापेक्षा कमी कॉर्पस
जर अंशधारकाचा फंड पाच लाख रुपये किंवा यापेक्षा कमी असेल तर तो संपूर्ण जोडण्यात आलेली पेन्शन एकरकमी काढू शकतो.
पीएफआरडीएने म्हटले की, तीन वर्षापूर्वी एनपीएसमधून बाहेर पडणे ‘प्रीमॅच्युअर एक्झिट’ मानले जाईल.
यामध्ये अंशधारकाला ‘एन्यूइटी’साठी किमान 80 टक्के फंडचा वापर करावा लागेल.
जर अंशधारकाला वेळेपूर्वी एनपीएसमधून बाहेर पडायचे असेल आणि त्याचा फंड 2.5 लाख रुपयांपेक्षा
कमी आहे, तर तो जोडण्यात आलेली पूर्ण रक्कम एकदाच काढू शकतो.
Web Title : Pune Crime | What do you say Yes, theft in 439 flats in Pune, know the case
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update