SBI च्या 44 कोटी ग्राहकांना मोठा दिलासा ! आता फक्त एका कॉलवर होतील सर्व महत्वाची कामं, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशात कोरोनाच्या दुस-या लाटेने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन काही बॅंकांनी आपल्या ग्राहकांसाठी विविध सुविधा सुरु केलेल्या आहेत. अशातच स्टेट बॅक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी घरबसल्या बँकेची विविध काम करण्याची सुविधा दिली आहे. एसबीआयने ग्राहकांसाठी कॉन्टॅक्ट लेस सेवा सुरू केली आहे. त्यामुळे आता युजर्सला घरबसल्या बँकांशी संबंधीत काम करता येणार आहे. त्यामुळे SBI च्या 44 कोटी ग्राहकांना या सेेवेचा फायदा होणार आहे.

SBI ने आपल्या ट्विटर हॅंडलवर याची माहिती दिली आहे. एसबीआय बॅंक संपर्करहीत सेवा देत आहे. ज्यामुळे तुम्ही तुमची बॅंकेची काम सहज पुर्ण करता येतील. तसेच एसबीआयचा टोल फ्री क्रमांक असणाऱ्या 1800 112 211 आणि 1800 425 3800 या क्रमाकांवर तुम्ही कॉल करू शकता. तसेच बॅकेने आपल्या ट्वीटर हॅंडलवर एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. ज्यात फोन कॉलिंगच्या सुविधेची माहिती दिली आहे. SBIच्या टोल फ्री क्रमांकावर फोन करुन कोणकोणत्या सुविधा सुरु आहेत, याची माहिती दिली आहे. अकाऊंट बॅलन्सची माहिती, लास्ट 5 ट्रान्जेक्शन, ATM बंद करणे, सुरु करणे, ATM पिन किंवा ग्रीन पिन जनरेट करणे. नवीन ATM साठी अप्लाय करणे आदी सुविधा दिल्या आहेत. यापूर्वी SBI ने गर्दी टाळण्यासठी बँकेच्या शाखेत न जाता घरबसल्या व्हिडीओद्वारे केवायसी एपडेट करण्याचा पर्याय उपलब्ध करुन दिला होता..