Cash आणि Cards बाळगण्याची नाही आवश्यकता, आले Contactless Wearable Payment

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आता घरातून बाहेर पडताना खिशात कॅश किंवा क्रेडिट किंवा डेबिट कार्ड बाळगण्याची आवश्यकता नाही…अणि होय, आता तुम्हाला पेमेंटसाठी मोबाइल काढण्याची सुद्धा आवश्यकता नाही. आता तुम्ही पेट्रोल भरणे किंवा एखाद्या स्टोअरमधून सामान खरेदी केल्यानंतर केवळ एका घडाळ्याच्या मदतीने पेमेंट करू शकता. या शानदार टेक्नॉलॉजीबाबत जाणून घेवूयात…

आता पेमेंटसाठी होईल घडाळ्याचा वापर
कोरोना व्हायरस संसर्गानंतर Contactless आणि Digital Payment चा खुप वापर होऊ लागला आहे. अजूनपर्यंत लोक केवळ टच अँड पे आणि युपीआय पेमेंटचाच वापर करत होते. परंतु आता घडाळ्याच्या मदतीने पेमेंट करण्याचे तंत्रज्ञान आले आहे. यास वेयरेबल पेमेंट डिव्हाइस सुद्धा म्हटले जाते.

SBI आणि Axis Bank ने सुरू केली आहे सेवा
नुकतेच स्टेट बँक ऑफ इंडिया आणि अ‍ॅक्सिस बँकेने डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी वेयरेबल पेमेंटची सुरुवात केली आहे. या दोन्ही बँका अशी घड्याळे उपलब्ध करून देत आहेत, जी मशीनजवळ नेताच पेमेंट होते.

5000 रुपयांपर्यंत होऊ शकते पेमेंट
नुकतेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने Contactless ट्रांजक्शनची मर्यादा 2000 रुपयांनी वाढवून 5000 रुपये केली आहे. म्हणजे 5000 रुपयांपर्यंतच्या पेमेंटसाठी तुम्हाला पिन नंबर टाकण्याची आवश्यकता नाही. एखाद्या वाय-फाय कार्ड किंवा वेयरेबल डिव्हाइसच्या मदतीने पेमेंट केले जाऊ शकते.

नवी नाही ही टेक्नॉलॉजी
वेयरेबल पेमेंट डिव्हाइसचे तंत्रज्ञान भारतात आता लाँच होत असले तरी ही टेक्नॉलॉजी नवी नाही. अमेरिका आणि युरोपसह अनेक देशात स्मार्टवॉचच्या मदतीने पेमेंट केली जातात. अ‍ॅप्पल, सॅमसंग आणि फिटबिटच्या स्मार्टवॉचमध्ये पेमेंट ऑपशन अगोदरपासूनच आहे.

कोरोना व्हायरस महामारीच्यानंतर झाला निर्णय
कोरोना व्हायरस महामारी पसरल्यानंतर बहुतांश लोक कॅश किंवा कार्डने सुद्धा पेमेंट करण्यास टाळाटाळ करत आहेत. जगभरात आता लोक डिजिटल आणि कॉन्टॅक्टलेस पेमेंटलाच प्राधान्य देत आहेत.