PIL In Mumbai High Court | दिशा सालियन आणि सुशांतसिंह राजपूत मृत्यूसंदर्भात आदित्य ठाकरेंची चौकशी करा, मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – PIL In Mumbai High Court | बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आणि दिशा सालियन (Disha Salian) यांच्या आत्महत्या प्रकरणी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची चौकशी करावी अशी मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्ट (Supreme Court) आणि हायकोर्टातील अशिलांच्या संघटनेचे अध्यक्ष रशिद खान पठाण (Rashid Khan Pathan) यांनी ही जनहित याचिका दाखली आहे. या याचिकेवर प्राथमिक सुनावणी हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरीफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर झाली. यावर लवकरच सविस्तर सुनावणी होण्याची शक्यता आहे. (PIL In Mumbai High Court)

मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये केंद्रीय तपासयंत्रणेतील सीबीआय अधिकाऱ्यांवरही ढिलाईने काम केल्याबद्दल कारवाई करण्याची मागणी केली आहे. याशिवाय राज्याच्या महाधिवक्त्यांना सीबीआय (CBI) विरोधात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचा अवमान केल्याबाबत याचिका दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकेतून केली आहे. (PIL In Mumbai High Court)

जनहित याचिकेत नेमकं काय?

सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियन यांच्या आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांना ताब्यात घेऊन चौकशीची का गरज आहे? हे पटवून देताना अनेक आरोप करण्यात आले आहेत. 8 जून 2020 रोजी दिशा, आदित्य ठाकरे, राहुल कनाल, सूरज पांचोली, सचिन वाझे, एकता कपूर यांच्या मोबाईलचे लोकेशन तपासण्यात यावे. कारण त्या रात्री हे सर्वजण 100 मीटरच्या परिसरात एकत्र होते. तसेच 13 आणि 14 जून 2020 रोजीचं सुशांत, रिया चक्रवर्ती, आदित्य ठाकरे, अरबाज खान, संदीप सिंह, शौविक चक्रवती यांचे देखील मोबाईल लोकेशन तपासण्यात यावे. या दोन दिवशीच्या आसपासच्या परिसरात आदित्य ठाकरे यांच्या संबंधित सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावं.

सुशांतसिंह राजपूत याचा मृत्यू झाला त्या दरम्यान आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती यांच्यात 44 वेळा फोनवर काय बोलणं झालं? याची चौकशी करण्यात यावी. सुशांत आणि रियाच्या मृत्यूवर सवाल उठवणाऱ्या सर्वांची साक्षी पुराव्यांची सखोल चौकशी व्हावी. भाजप आमदार नीतेश राणे यांनी आदित्य ठाकरेवर केलेल्या लहान मुलांच्या लैंगिक शोषणासंदर्भातील आरोपांची चौकशी व्हावी, अशी मागणी याचिकेतून केली आहे.

सुशांत-दिशा मृत्यू प्रकरणात राहुल कनाल यांचा मोठा दावा

माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी राहुल कनाल यांनी दोन महिन्यांपूर्वी शिवसेना
(उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला राम राम केला. कनाल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या
शिंदे गटात प्रवेश केला. त्यावेळा राहुल यांनी सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान प्रकरणावर भाष्य केलं.
सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान प्रकरणाची फाईल पुन्हा ओपन करुन सखोल चौकशी करण्याची मागणी
राहुल कनाल यांनी केली होती. दिशा सालियान प्रकरणाची कारवाई टाळण्यासाठी त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याची टीका
होत होती. यावर मुख्यमंत्र्यांना उद्देशून कनाल यांनी म्हटले की, जर या प्रकरणात माझे नाव कुठेही आले तर तुमच्या
चपला खाण्यासाठी तयार आहे. या प्रकरणात सखोल चौकशीची गरज आहे,
तुम्ही ज्याठिकाणी सांगात तिथे जायला मी तयार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | फ्लॅटच्या बाहेर बुटात चावी ठेवणे पडले महागात, पुण्यात चोरट्यांनी घर साफ केलं