PIL To Ban Loud DJs Sound System | आरोग्यावर परिणाम करणार्‍या कर्णकर्कश DJ वर बंदी आणण्यासाठी राजकिय आणि सामाजिक कार्यकर्ते जनहीत याचिका दाखल करणार

पुणे : PIL To Ban Loud DJs Sound System | गणेशोत्सवच नव्हे तर प्रत्येक सण, जयंती, पुण्यतिथीनिमित्त रस्ते अडवले जात आहेत. साउंड सिस्टीमच्या भिंती (DJ Sound System) उभारून दणदणाटाने सर्वसामान्य नागरिक, वयस्कर आणी आजारी नागरिकांचा शांतीपूर्वक जगण्याचा हक्क हिरावून घेतला जात आहे. या विरोधात जागृत पुणेकर म्हणून कायदेशीर मार्गाने लढा देण्यासाठी उच्च न्यायालयात (Mumbai High Court) जनहित याचिका दाखल केली जाणार आहे. (PIL To Ban Loud DJs Sound System)

माजी महापौर अंकुश काकडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. काकडे यांच्यासह स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. श्रीकांत शिरोळे, माजी उपमहापौर डॉ. सतीश देसाई, खासदार शरद पवार यांचे माजी स्वीय सहायक प्रल्हाद भागवत आणि महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर यांच्या वतीने अ‍ॅड.. शिरोळे येत्या आठवड्यात ही याचिका दाखल करणार आहेत. यासोबतच कॅटलिस्ट फौंडेशनचे अध्यक्ष सुनिल माने आणि शिवसेना (शिंदे गट) सहसंपर्क प्रमुख अजय भोसले हे देखिल यासंदर्भात स्वतंत्र जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहिती माने यांनी दिली. (PIL To Ban Loud DJs Sound System)

पुण्यातील यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत स्पीकरबाबतचे सर्व नियम धाब्यावर बसवले गेले. कर्णकर्कश स्पीकरच्या दणदणाटामुळे अनेकांना आरोग्य समस्यांचा सामना करावा लागला. तसेच लेझर लाइटच्या वापरामुळे काहींच्या दृष्टीपटलावरही परिणाम झाला. यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत कोणतेही निर्बंध पाळले गेले नाहीत. पोलिसांनाही बघ्याची भूमिका घेत कारवाई केली नाही. मनात आणले तर पोलिस काय करू शकतात, हे तोरण मिरवणुकांवर घातल्या गेलेल्या बंदीतून स्पष्ट होते. त्यामुळे कायद्याचे पालन न करणार्‍या मंडळांबरोबरच, पोलिसांवरही कारवाई व्हावी, अशी मागणी आम्ही करणार आहोत, असे काकडे म्हणाले. (Pune News)

या वेळी विसर्जन मिरवणुकीवेळी स्पीकरचा आवाज किती होता, याची माहिती आम्ही संकलित करत आहोत. पोलिसांकडून आवाजाची माहिती तसेच लेझर लाइटमुळे डोळ्यांना इजा झालेल्या पोलिसांची माहिती आम्ही पोलिसांकडे मागितली आहे. अद्याप ही माहिती आम्हाला मिळालेली नाही. ही माहिती संकलित करून तातडीने जनहित याचिका दाखल केली जाईल, असे काकडे म्हणाले. आम्ही कोणत्याही विशिष्ट धर्माविरोधात नाही. सर्वच धर्मातील अनिष्ट प्रथेविरोधात आवाज उठवत आहोत. न्यायालयाचा आदेश सर्वांनाच पाळावा लागेल, असे काकडे यांनी नमूद केले.

सण- उत्सव तसेच विविध समाजिक राजकीय कार्यक्रमात होणार्‍या हुल्लडबाजी तसेच बेकायदेशीर प्रकारामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. अनेक पोलिसांनाही याचा त्रास सहन करावा लागला आहे.
यावर्षी गणेश उत्सव विसर्जन मिरवणुकीनंतर धुळ्यातील १५ पोलिसांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुण्यातही या पेक्षा वेगळी परिस्थिती नव्हती.
यावर्षी डॉल्बीच्या आवाजाने दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
डीजेचा आवाज अमर्यादित ठेवल्या संदर्भात आम्ही प्रदूषण मंडळाकडूनही माहिती घेत आहोत.
यासंदर्भात आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पुणे विभागीय अधिकारी श्री. शंकर वाघमारे यांच्याशी चर्चा केली आहे.
त्यांनी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर येथे गेल्या वर्षभरात केलेल्या कार्यवाहीचे स्वरूप,
दाखल केलेल्या गुन्ह्यांची आकडेवारी ते देणार आहेत.
त्यानुसार आम्ही राज्यभरात डीजे आणि लेझरला बंदी घालावी म्हणून मुंबई हायकोर्टात जनहित
याचिका दाखल करत आहोत, असे कॅटलिस्ट फाउंडेशनचे सुनिल माने यांनी कळविले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jayant Patil On Ajit Pawar | जयंत पाटील यांची अजित पवार गटावर बोचरी टीका;
म्हणाले – ‘अडचणीत गेल्यामुळे वळचणीला जाऊन बसावे लागले’

Tanaji Sawant | दोन नंबरचा धंदा पोलिसांच्याच आशीर्वादाने सुरू, आरोग्यमंत्री तानाजी सावंतांकडून
पिंपरी चिंचवड पोलिसांची खरडपट्टी (व्हिडिओ)